कर्‍हाड पोलिस लय धडाकेबाज... "मोक्का'चे अर्धशतक

Maharashtra Police Logo
Maharashtra Police Logo

कऱ्हाड : शहर व परिसरात वाढणाऱ्या संघटित गुन्हेगारी व गुंडगिरीचा समूळ नाश करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठोस पावले उचलली आहेत. त्यात संघटित गुन्हेगारी, गुंडगिरीला लगाम लावण्यासाठी मोक्का कायद्यानुसार कारवाईचा धडाका लावला आहे. सहा टोळ्यांवर थेट मोक्कांतर्गत कारवाई करत पोलिसांनी सुमारे 50 गुंडांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. कारवाई झालेल्या सहा टोळ्या व्यतिरिक्त आणखी तीन टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे कऱ्हाड पोलिसांची मोक्कातील अर्धशतकी कारवाई पूर्ण झाली आहे. 

गुंडगिरीसह संघटित गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. शहरातील तीसपेक्षा जास्त गुंडांच्या मोक्काच्या कारवाईने मुसक्‍या आवळल्या आहेत. आगाशिवनगरच्या खुनातही मोक्काची कारवाई होणार आहे. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे गुंडगिरीसह संघटित गुन्हेगारीच्या पाळेमुळांवर घाव घालण्याचे सुरू आहे. मोक्काची सुरवात 2001 मध्ये झाली. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संजय शिंत्रे यांनी सात जणांची टोळी गजाआड केली. त्यानंतर तब्बल काही वर्षे मोक्काची कारवाई नव्हती. त्यानंतर थेट 15 वर्षांनंतर कारवाई झाली.

2016-17 मध्ये गुंडांच्या वर्चस्ववादातून वाढलेल्या टोळीयुद्धाला लगामासाठी दोन वेगवेगळ्या टोळ्यांवर मोक्काची कारवाई झाली. त्यानंतर 2018-19 मध्ये सलग तीन टोळ्यांवर मोक्काचा हातोडा पडला. संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी गुंडगिरी आटोक्‍यात यावी, यासाठी मोक्का कायद्याचा पोलिसांनी वापर केला आहे. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शिंत्रे यांनी मोक्काची कारवाई करत केतकर टोळीला गजाआड केले. त्यानंतर दहा वर्षाने पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले. त्यातील अनेक घटना व त्याला पाठीशी घालणाऱ्या कारवाया वाढल्याने येथील टोळी युद्धालाच खतपाणी घातल्याचा प्रकार झाला. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मनोज पाटील यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. 


श्री. पाटील यांच्यानंतर परिणामकारक कारवाईची गरज लक्षात घेऊन मोक्काच्या पर्यायाचा अवलंब येथे झाला. त्यानंतर तलवारीने होणारी मारामारी बंदुकीवर आली. 2009 नंतरची स्थिती विदारक झाली. त्यामुळे पोलिसांनाही कडक पावले उचलणे भाग पडले. मात्र, तरीही गुंडगिरीची पाळेमुळे खणण्यात पोलिसांना अपेक्षित यश येत नव्हते. त्यामुळे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्या काळापासून पुन्हा मोक्काच्या कारवाईचे सत्र पोलिसांनी हाती घेतले. त्यांनी दोन टोळ्या गजाआड करत थेट मोक्काची अंमलबजावणी केली. त्यात सल्या चेप्यासारख्या टोळीचाही समावेश होतो. त्यानंतरच्या कालावधीत पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनीही मोक्काच्या कायद्यानुसार कारवाई करत थेट सल्या चेप्यावरच कारवाई केली.

मयूर गोरे युवकाचा खून झाला. त्याही प्रकरणात तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शिवणकर यांनी मोक्काची कारवाई केली. त्यानंतर सल्या चेप्यावर झालेल्या गोळाबार प्रकरणातील संशयित आप्पा साळवे टोळीवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. उंब्रजला दरोडा टाकणाऱ्या टोळीतील संशयितांनाही मोक्कात अटक झाली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी येथे पवन सोळवंडे याच्या खुनातील 16 संशयितांनाही मोक्का लावला. त्यामुळे मोक्कांतर्गत अलीकडच्या पाच वर्षांत पाचपेक्षाही जास्त टोळ्या पोलिसांनी मोक्काच्या कारवाईच्या रडावर घेतल्याचे दिसते. त्यात सुमारे पन्नासहून अधिक संशयितांना अटक झाली आहे. 

नवनाथ ढवळेंच्या काळात जास्त कारवाया 

मोक्का कायद्याची अंमलबजावणीचा धडाका पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या काळात जास्त झाला. त्यात कऱ्हाडचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी मोठ्या कारवाया केल्या. त्यात उंब्रजच्या दरोडा प्रकरणातील संशयित, वडगाव हवेलीतील दरोडा प्रकरणातील संशयितांसह पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयितांवरही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात ढवळे यांनी भूमिका बजावली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com