राजे 'खरा बच्चन' आला नाही तरी चालेल, पण... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सातारा - राजधानी महोत्सवाला अमिताभ बच्चन येणार, हे मोठे आकर्षण होते. मात्र, बच्चन आलेच नाहीत. आला पाऊस... पण या गडबडीतही बच्चन यांना साताऱ्यात आणणार, अशी घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. त्यांच्या या घोषणेची जोरात चर्चा आहे. मात्र, साताऱ्याचे बच्चन तुम्हीच (उदयनराजे) आहात, "खरा बच्चन' आला नाहीतरी चालेल पण जिल्ह्यात विकास आणा, असे मत नागरीक व्यक्त करत आहेत.

सातारा जिल्ह्यातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विविध प्रकल्पांची कामे, पुनर्वसनाचा प्रश्‍न, विमानतळ, कऱ्हाड चिपळूण लोहमार्ग, मेडिकल कॉलेज, वळसे ते कागल महामार्गाचे सहापदरीकरण, कोरेगाव-माण- खटावमधील रखडलेले औद्योगिकीकरण, सातारा शहरातील स्वच्छतागृहांचा प्रश्‍न, डोंगर दऱ्यातील खराब रस्ते, पर्यटनविकास, आले, बटाटा व स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र आदींबाबींकडे कोणाचेच लक्ष नाही.

आता लोकसभा व विधानसभा निवडणुका आल्याकी सर्वांना मतदार व मतदारासंघाची आठवण होऊ लागली आहे. पण मागील निवडणुकीत आपण जनतेला दिलेली आश्‍वासने कितीपूर्ण झाली याचा लेखाजोखा मांडण्यास कोणी तयार नाही. 

प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत नुकताच साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी राजधानी महोत्सव घेतला. या महोत्सवातील खरे आकर्षण होते ते अमिताभ बच्चन यांना शिवसन्मान पुरस्काराचे वितरण. या निमित्ताने अमिताभ बच्चन व उदयनराजे भोसले (राजकारणातील बच्चन) एका व्यासपीठावर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण बच्चन आलेच नाहीत.

शेवटी राजकारणातील बच्चन यांनीच कार्यक्रम गाजविला. उदयनराजेंनी दिवाळीपर्यंत बच्चनला साताऱ्यात आणण्याचे वचन सातारकर नागरीकांना दिले. पण सातारकर जनतेला खऱ्या बच्चन ऐवजी उदयनराजे तुम्हीच आमचे बच्चन आहात, खरा बच्चन आला नाही तरी चालेल पण साताऱ्यात विकास आणा. इतर शहरांप्रमाणे ऐतिहासिक साताऱ्याचा कायापालट करा, अशी अपेक्षा समस्त सातारकर नागरीक व्यक्त करू लागले आहेत.

Web Title: udyanraje bhosale amitabh bachhan