उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

या प्रकरणी उदयनराजेंनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा न्यायाधीश ए. एन. शिरशिकर यांनी आज फेटाळला.

सातारा - खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज (मंगळवार) जिल्हा न्यायालयाने फेटाळला.

मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजे यांच्याविरोधात सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनूसार उदयनराजे व दहा जणांवर खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे. उदयनराजेंना अद्याप अटक करण्यात आलेली नव्हती.

या प्रकरणी उदयनराजेंनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा न्यायाधीश ए. एन. शिरशिकर यांनी आज फेटाळला.

Web Title: Udyanraje Bhosles anticipatory bail application rejected by court