उजनी धरण "प्लस'मध्ये!

संतोष सिरसट
मंगळवार, 17 जुलै 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आज (ता.17) दुपारी चार वाजता "प्लस'मध्ये आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दौंड येथून धरणात 63 हजार क्‍युसेकने पाणी मिसळत आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या कृषी विकासाला हातभार लागलेल्या उजनी धरणाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. उन्हाळ्यात जवळपास वजा 20 टक्‍यांपर्यत गेलेल्या धरणात पुणे जिल्ह्यातून पडलेल्या पावसाचे पाणी येत असल्याने पाणी पातळी वाढली आहे. "मायनस'मध्ये गेलेले धरण आज दुपारी चार वाजता "प्लस'मध्ये आले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे यापुढील काळातही त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येणार आहे. 

धरणातील पाण्याची दुपारी चारची स्थिती 
- पाणीपातळी : 491.030 मीटर 
- एकूण पाणीसाठा : 1208.81 द. ल. घ. मी. 
- टक्केवारी : 0 टक्के 
- दौंड विसर्ग : 63 हजार क्‍युसेक 

भीमा नदीत पाणी सोडणे केले बंद 
पुढील आठवड्यात आषाढी एकादशी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंढरीत 10 ते 12 लाख वारकरी येतात. त्या वारकऱ्यांच्या स्नानाची सोय व्हावी, यासाठी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडले जात होते. ते पाणी सोडणे आज दुपारी चारनंतर बंद करण्यात आले. धरणातून नदीमध्ये चार हजार 700 क्‍युसेकने पाणी सोडले जात होते.

Web Title: ujani dam becomes in plus