दुपारी 12 नंतर उजनीतून भीमा नदीत सोडणार पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण जवळपास 50 टक्‍क्‍यांच्या आसपास येऊन पोहोचले आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात जवळपास 43 टक्के पाणी आले होते. पुढील अनर्थ टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने उजनी धरणातून दुपारी बारानंतर 1600 क्यूसेस ने पाणी भीमा नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी भीमा नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे.

भीमा नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
सोलापूर - पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण जवळपास 50 टक्‍क्‍यांच्या आसपास येऊन पोहोचले आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात जवळपास 43 टक्के पाणी आले होते. पुढील अनर्थ टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने उजनी धरणातून दुपारी बारानंतर 1600 क्यूसेस ने पाणी भीमा नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी भीमा नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे.

दौंड येथून भीमा नदी मध्ये जवळपास 85000 क्यूसेस ने पाणी येत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे. दुपारनंतर पन्नाशी पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणारा पाण्याचा विसर्ग पाहता पुढील अनर्थ  टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत, त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये पाणी सोडले जात आहे. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज लक्षात घेता प्रशासनाने भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ujani Dam Water Release after 12 noon Rain