उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा -  उजनी धरण पुर्ण क्षमतेनी भरल्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला असला तरी त्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन योग्य केले जाईल शिवाय उपलब्ध पाण्याचा वापर देखील काटकसरीने करण्याचे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. 

तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे गोपाळपूर, ओझेवाडी, उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी या बरीच वर्षे रखडलेल्या रस्त्याचा कामाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आ.प्रशांत परिचारक, दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, शिवाजी नागणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत चव्हाण, माजी शिक्षण सभापती शिवानंद पाटील, युन्नुश शेख, दामाजीचे माजी अध्यक्ष चरणुकाका पाटील, चंद्रशेखर कौडूभैरी, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, बबलू सुतार, श्रीकांत गणपाटील, मनोज पुजारी, विजयसिंह पाटील, सुनिल पाटील, सिध्देश्वर कोकरे, आदीसह या परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले की या तालुक्यातील विविध कामासाठी आ.परिचारक सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी मागणी केलेल्या रस्त्याच्या कामाला निधी दिला असून याशिवाय राहिलेल्या कामासाठी निधी देण्यासाठी आमचे शासन प्रयत्नशील आहे.तालुक्यातील अन्य प्रश्नांच्या संदर्भात जनतेनी आ.परिचारक असो अथवा माझेकडे आल्यास त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.विभक्त शिधापत्रिकाधारकाला रेशनचा माल आणि वृद्ध कलावंतचा मानधनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी आ.परिचारक म्हणाले की तालुक्यातील रस्ते खराब झाले,त्यासाठी स्वत लक्ष घालून प्रयत्न केले.म्हणून निधी मिळाला असला यापुढील काळातही रस्ते,वीज,पाणी हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. टाटाच्या धरणातील 45 टी.एम.सी पाणी पुणे, अहमदनगर, सोलापूर ला मुख्यमंत्र्यानी सकारात्मकता दर्शवली असून या तीन आमदारांची समिती नियुक्ती केली. तालुक्यातील अन्य प्रश्न सोडविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.प्रास्ताविक मनोज पुजारी यांनी केले. सुत्रसंचालन दिलीप बिनवडे आभार विजय पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com