उजनीचा पाणीसाठा 14 टक्‍क्‍यांवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

केत्तूर - उजनी जलाशयाचा पाणीसाठा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवघ्या 14 टक्‍क्‍यांवर आला आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा होऊनही उजनी उणे पातळीवर जाणार, हे निश्‍चित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणीपातळी खालावत असल्याने शेतकऱ्यांनी जलाशयात पाण्यासाठी खणण्यात येणाऱ्या चाऱ्यानी डोके वर काढले आहे. 

यंदा उजनी पूर्ण क्षमतेने भरल्याने उन्हाळा सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी सुखकर गेला असला, तरी उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा मात्र त्रासदायक ठरू लागला आहे. काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता, मार्चअखेरीस उजनीच्या पाण्याचा प्रवास हा नदीपात्राकडे सुरू होतो. त्यामुळे करमाळा, इंदापूर, दौंड, कर्जत या प्रमुख तालुक्‍यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. मार्चपासूनच पाणलोट क्षेत्रात पाण्याचा खडखडाट होत असल्याने शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष असतो. सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्याने उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. आणखी एक पाळी भीमा नदीद्वारे सोडले जाणार असल्याने या वर्षीही उजनी उणे पातळीत जाणार, हे निश्‍चित. 

उजनी अपडेट (मंगळवारपर्यंत)  
पाणीपातळी : 492.110 मीटर 
एकूण पाणीसाठा : 2027.20 द.ल.घ.मी. (75.58) 
उपयुक्त पाणीसाठा : 224.39 (7.92) 
टक्केवारी : 14.79 टक्के 
विसर्ग कालवा : 1500 व 
सीना माढा : 240 क्‍युसेक 

Web Title: Ujani water storage at 14 percent