मोहोळ मधील दोन तलावात उजनीतून पाणी सोडणार

from ujani will release water in two ponds of mohol
from ujani will release water in two ponds of mohol

मोहोळ : येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील आष्टी व कामती बुद्रुक या दोन तलावात उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत डोंगरे यांनी ही मागणी केली असून त्यास होकार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे झाली. त्यावेळी डोंगरे यांनी मोहोळ तालुक्याचे वास्तव मांडले. यावेळी आमदार गणपत देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, पाटबंधारे विभागाचे अभियंता धीरज साळुंखे यांच्यासह विविध पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

डोंगरे म्हणाले, 'आष्टी तलावावर अनेक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. तर सुमारे 17 हजार एकर बागायती आहे सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलीच आहे. विहिरी व बोरचे पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे आणखी दोन महिन्यात परिस्थिती गंभीर होणार आहे. त्यामुळे उजनी कालव्याला सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या माध्यमातून दोन वेळा पाणी सोडले, तर पाणीटंचाई जाणवणार नाही. तसेच सध्या चारा टंचाई आहे. त्यामुळे शेतात उभ्या असणाऱ्या मका कडवळ पिकांनाही जीवदानी मिळून चाराटंचाई संपुष्टात येणार आहे.'
 
कामती बुद्रुक येथे अडीचशे एम. एल. डी. पाणी साठवण क्षमतेचा गाव तलाव आहेत. उजनी आवर्तन वेळी त्यात पाणी सोडले, तर परिसरातील पाणी टंचाई कमी होणार असून पाणीपुरवठा विहिरी, बोर यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे शासनाचा टँकरवर होणारा लाखो रुपये खर्च वाचणार आहे. कामती बुद्रुक कामती खुर्द व त्या परिसरातील ज्या ज्या तलावात पाणी सोडणे शक्य आहे. ते पाण्याने भरले तर पाणीटंचाईच्या झळा अत्यल्प प्रमाणात बसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com