सोलापुरात हटविली अनधिकृत धार्मिक स्थळे

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सोलापूर : शहरातील 10 अनधिकृत धार्मिक स्थळे महापालिकेच्या पथकाने  पाडून टाकली. उर्वरित धार्मिक स्थळे येत्या दोन दिवसांत पाडण्यात येतील, असे बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. 

सोलापूर : शहरातील 10 अनधिकृत धार्मिक स्थळे महापालिकेच्या पथकाने  पाडून टाकली. उर्वरित धार्मिक स्थळे येत्या दोन दिवसांत पाडण्यात येतील, असे बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. 

न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम  महापालिकेच्या बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या ताफ्यासह हाती घेतली. शहरातील विविध ठिकाणी असलेली 24 अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी सहा अनधिकृत धार्मिक स्थळे गेल्या आठवड्यात संबंधित व्यक्तींनी स्वतःहून हटविली होती. यामध्ये बाळीवेस आणि पुणे नाका जवळील दोन अनधिकृत धार्मिक स्थळांचा तर नोटिसा मिळाल्याने शहरातील विविध भागातील आणखी चार धार्मिक स्थळे संबंधितांनी स्वतःहून पाडल्याचा समावेश होता. महापालिकेच्या झोन क्रमांक एक, तीन, सात आणि आठ यामधील 19 अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे शिल्लक राहिले होते. यामुळे ही मोहीम हाती झाली. स्थानिक परिसरातील लोकांच्या सहभागाने ही धार्मिक स्थळे हटविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर यामध्ये आणखी काहींचे नियमितीकरणासाठी अर्ज प्राप्त असल्याने यावर प्रक्रिया सुरू आहे. 

शहरातील या 19 अनधिकृत धार्मिक स्थळपैकी 10 धार्मिक स्थळे  हटविण्यात आली. शाहीरवस्ती परिसरातील सावळगी बोळातील जागृती हनुमान मंदिर, एसटी स्टॅंड परिसरातील झांबरे बोळातील गणपती मंदिर, दक्षिण कसबा परिसरातील शनी मंदिर बोळातील स्वामी समर्थ मंदिर आणि साई मंदिर ही धार्मिक स्थळे लोकांच्या सहाय्याने हटविण्यात आली. तसेच भुसार गल्ली येथील मालक गणपती मंदिर संबंधितांनी स्वतःहून हटविले तर मंगळवेढा तालीम परिसरातील गणपती मंदिर अन्य ठिकाणी मंदिर तयार करून मूर्ती तेथे ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: Unauthorized Religious Places Destroyed in Solapur