सख्या मामानेच केला भाच्याचा खून; असे उलगडले खुनाचे रहस्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

प्रभाकर पाटील हा मामा मडके यांना शेती विकून आलेले पैसे द्या म्हणून वारंवार मागणी करून त्रास देत होता. म्हणून मडके हा प्रभाकरवर चिडून होता.

कोरवली ः वटवटे (ता.मोहोळ) येथील प्रभाकर शिवाप्पा पाटील (वय 28) याचा शुक्रवारी (ता.26) रात्री देवीच्या कट्ट्यावर खून झाला होता. हा खून त्याचा सख्खा मामा नारायण कोंडीबा मडके यांनीच केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

प्रभाकर पाटील हा मामा मडके यांना शेती विकून आलेले पैसे द्या म्हणून वारंवार मागणी करून त्रास देत होता. म्हणून मडके हा प्रभाकरवर चिडून होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता दोघांमध्ये पैशांच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून रात्री नऊ ते दहाच्या सुमारास मामाने प्रभाकरच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केला.

खून करून आरोपी ऊसाच्या शेतात लपून बसला होता. श्वानपथकामुळे पोलिसांना आरोपीपर्यत पोहचणे शक्‍य झाले. श्वान सरळ पोलिसांना आरोपींच्या घरापर्यत घेऊन गेले. पोलिसांनी चार तास चिखल तुडवून आरोपीला चोवीस तासात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle committed murder of nephew secret of the murder is revealed

टॅग्स