मंगळवेढ्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

हुकूम मुलाणी
रविवार, 19 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : तालुक्यातील गोणेवाडी ते जुनोनी रस्त्यालगतच्या शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी वाढली असून मृत व्यक्ती कोण आहे याचा तपास सुरू झाला आहे.

दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे व पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे हे पोलिस पथकासह दाखल असून मृतदेह पुरूष जातीचा असून शेजारी काल नंदेश्वरहून बाजार करून नेलेली माळव्याची पिशवी व काळी परगोन चप्पल आहे. याचा मृत्यू नेमका कशामुळे आणि मृत व्यक्ती कोण याचा पोलीस तपास सुरू जलद तपासाच्या दृष्टीने श्वानपथक पाचारण केले असल्याचे समजते.

Web Title: An unidentified body was found in the Mangaldas area