esakal | विद्यापीठ, महाविद्यालयात ‘एक्झाम फिव्हर’
sakal

बोलून बातमी शोधा

exam

बेळगाव : विद्यापीठ, महाविद्यालयात ‘एक्झाम फिव्हर’

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : पदवीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर पदव्युत्तरच्या परीक्षांना १७ पासून सुरुवात होणार आहे. यामुळे महाविद्यालयांध्ये ‘एक्झाम फिव्हर’ दिसून येत आहे. पुढील पंधरा दिवस महाविद्यालयात परीक्षेचेच वातावरण असणार आहे. अंतीम वर्षाचे विद्यार्थीही अभ्यासात गुंग झालेले आहेत.

राणी चन्नम्मा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या पदवी महाविद्यालयांच्या अंतीम वर्षीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. तर पदव्यूत्तरच्या अंतीम वर्षातील परीक्षा १७ पासून होणार आहेत. यामुळे अभ्यासात तर विद्यापीठ परीक्षेच्या तयारी गुतलेले आहे. यंदा पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या तसेच पदव्यूत्तरच्या पहिल्या वर्षतील विद्यार्थ्यांना परीक्षेतून सुट मिळाली आहे. यामुळे फक्त अंतीम वर्षातील मोजक्याच विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

पदवी आणि पदव्यूत्तरच्या गेल्या काही दिवसांपूर्वी मागील सेमीस्टरच्या परीक्षा झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा परीक्षांचे आयोजन केले जात असल्याने मागील महिनाभरापासून विद्यापीठ व महाविद्यालयात परीक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. पदव्यूत्तरची परीक्षा अवध्या दोन दिवसात असल्याने विद्यार्थी नोट्सची जमवाजमव करण्यात गुंतले आहेत. पदव्यूत्तरच्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रोजेक्ट वर्क असते. प्रोजेक्ट करण्यातही काही विद्यार्थी गुंतले आहेत. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे फक्त ऑनलाईन वर्ग झालेले आहेत. तसेच सध्या ऑफलाईन परीक्षांचे विद्यापीठ आयोजन करत आहे. यामुळे विद्यार्थीही गोंधळात सापडले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांकडून अभ्यासावर भर दिला जात आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! पाकच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड; देशभरात करणार होते घातपात

परीक्षेनंतर पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया

कोरोनामुळे यंदा पदवीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे पदवीच्या अंतीम वर्षातील परीक्षा झाल्यानंतर त्यांना पदव्यूत्तरसाठी प्रवेश मिळणार आहे. यामुळे विद्यापीठाला देखील पदवीचा निकाल लवकर लावावा लागणार आहे. त्यानंतर विद्यापीठाला पदव्यूत्तरच्या पुढील शैक्षणिक वर्षाचे आयोजन करावे लागणार आहे.

पदवी, पदव्युत्तरचे इतके विद्यार्थी देणार परीक्षा

यंदा फक्त अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बेळगाव, बागलकोट व विजापूर येथील महाविद्यालयात पदवीचे सुमारे १५००० तर पदव्यूत्तरचे सुमारे २५०० विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून उपलब्ध झाली आहे.

"विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात सध्या पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. तर पदव्यूत्तरच्या परीक्षा पुढे गेल्या आहेत. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बेळगाव, बागलकोट व विजापूर येथील महाविद्यालयात पदव्यूत्तरपेक्षा पदवीचे विद्यार्थी अधिक आहेत. महाविद्यालयात परीक्षेचे वातारण आहे."

-एस. एम. हुरकडली, मुल्यांकण निबंधक, राणी चन्नमा विद्यापीठ

loading image
go to top