घराच्या कडीला वीजेचा करंट जोडुन धोका पोहचवण्याचा अज्ञाताचा कट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कुडाळ : कोलेवाडी गाढवेवाडी (ता. जावली) येथे घराच्या दाराच्या कडीला वीजेचा करंट जोडुन संबंधितांच्या जीवाला धोका पोहचवण्याचा अज्ञाताने कट रचला. या घटनेत एका महिलेला वीजेचा जोरदार धक्का बसला. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. परंतु रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती.

याबाबत समजलेली माहिती अशी, येथील एका कुटुंबातील आई ताराबाई एकनाथ तरडे घरातील  एका  खोलीत झोपले होते. तर त्यांचा मुलगा संतोष शेजारच्या खोलीत झोपला होता. मुलगा ज्या खोलीत झोपला होता त्या खोलीच्या दाराच्या कडिला अज्ञाताने वीजेचा करंट जोडला होता.

सकाळी सदर मुलाची त्याला उठवण्यासाठी गेली असता तिने दार उघडण्या साठी कडिला हात लावला असता आईला वीजेचा जोरदार शाँक बसुन त्या फेकल्या गेल्या.त्यामुळे त्या किरकोळ जखमी झाल्या.

त्यानंतर गोंधळ झाल्याने घरातील व शेजारी सर्व जमा झाले. सदरचा वीज प्रवाह जवळच्याच लाईटच्या डीपी पासून आणण्यात आले होते. थ्रिफेज वीज प्रवाहाचा करंट देऊन संबंधीतांच्या जीवाला धोका पोहचवण्याचा प्रयत्न होता. अशी चर्चा कोलेवाडी येथे लोकांमध्ये आहे. याबाबत ची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले व चौकशी केली. परंतु सबंधितांनी रात्री उशिरापर्यंत पर्यंत तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Unknown makes plan to kill by electric shock