लॅण्डलाइनवरून करा रविवारी अमर्याद कॉल्स 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

लॅण्डलाइन दूरध्वनीचा व्यवसाय पूर्वीसारखा भरभराटीला आणण्याच्या उद्देशाने भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) पुन्हा एकदा लॅण्डलाइनवरून रविवारी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल्सच्या (अनलिमिटेड फ्री कॉलिंग) योजनेस मुदतवाढ दिली आहे. देशभरात कुठेही नि:शुल्क कॉल करता येत असल्याने लॅण्डलाइनचे ग्राहक टिकू, तसेच वाढू लागल्याची माहिती बीएसएनएलमधून देण्यात आली. 
 

सातारा - लॅण्डलाइन दूरध्वनीचा व्यवसाय पूर्वीसारखा भरभराटीला आणण्याच्या उद्देशाने भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) पुन्हा एकदा लॅण्डलाइनवरून रविवारी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल्सच्या (अनलिमिटेड फ्री कॉलिंग) योजनेस मुदतवाढ दिली आहे. देशभरात कुठेही नि:शुल्क कॉल करता येत असल्याने लॅण्डलाइनचे ग्राहक टिकू, तसेच वाढू लागल्याची माहिती बीएसएनएलमधून देण्यात आली. 

सर्व शहरी व ग्रामीण भागातील लॅण्डलाइनचे साधारण प्लॅन हे लॅण्डलाइन स्पेशल, लॅण्डलाइन-ब्रॉडबॅण्ड कॉम्बो प्लॅन, एफटीटीएच हे पॅन इंडियाच्या धर्तीवर या योजनेत समाविष्ट आहेत. बीएसएनएलने ऑगस्ट 2016 मध्ये या योजनेस प्रारंभ झाला होता. आतापर्यंतच्या योजनांमध्ये देशभरात कोठेही अमर्याद मोफत बोलता येत असल्याने ही योजना लोकप्रिय ठरली. जानेवारी 2018 मध्ये कोणतेही कारण न सांगता ही योजना बंद झाली; परंतु ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे पुन्हा फेब्रुवारीत तीन महिन्यांच्या कालावधीसाठी योजनेस मुदत वाढ देण्यात आली. बीएसएनएलने खासगी दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेशी टक्कर देण्यासाठी योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस मोफत कॉल्सच्या सुविधेतील वेळेतही बदल केला आहे. ग्राहकांना रात्री साडेदहा ते सकाळी सहापर्यंत मोफत संवाद साधता येईल. ग्राहकांनी नजीकच्या बीएसएनएल ग्राहक केद्रांत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Web Title: unlimited calls from Landline on Sunday