कर्नाटक सरकरमध्ये नाराजीनाट्य  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

नूतन मंत्र्यांच्या खातेवाटपास आधीच विलंब झाला. त्यात सोमवारी (ता. 10) खातेवाटप जाहीर झाल्यानंतर काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पांना मंगळवारी (ता. 11) काहींच्या खात्यांमध्ये बदल करावा लागला.

बंगळूर : नूतन मंत्र्यांच्या खातेवाटपास आधीच विलंब झाला. त्यात सोमवारी (ता. 10) खातेवाटप जाहीर झाल्यानंतर काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पांना मंगळवारी (ता. 11) काहींच्या खात्यांमध्ये बदल करावा लागला. काही खात्यांची अदलाबदल करण्यात आली. तर काहींकडे अतिरिक्‍त खात्यांचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यानुसार श्रीमंत पाटील यांच्याकडे आता वस्त्रोद्योगाबरोबरच अल्पसंख्याक कल्याण खातेही आले आहे. 

हे पण वाचा - ढाई अक्षर अन्‌ एक ऑर्डर

नवीन मंत्र्यांना सोमवारी खाते वाटप करण्यात आले होते. मात्र, मिळालेल्या खात्यांवरुन काही मंत्री भलतेच संतापले. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याच दिवशी खात्यांमध्ये बदल करावा लागला. बी. सी. पाटील यांना वनऐवजी कृषी खाते देण्यात आले आहे. गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना अतिरिक्त खाते म्हणून कृषी खाते देण्यात आले होते. श्री. पाटील यांच्याकडील वनखाते आता आनंद सिंग यांना देण्यात आले आहे. तसेच त्यांना पर्यावरण व जैवविज्ञान खात्याचा अतिरिक्‍त कार्यभारही पाहावा लागणार आहे. 

हे पण वाचा - आता चप्पल, बूट अन्‌ बेल्टही बाहेर....

आनंद सिंग यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते गोपालय्या यांना देण्यात आले आहे. तसेच ग्राहक व्यवहार खात्याचाही कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी गोपोलय्यांकडील लघू उद्योग खाते आपल्याजवळ ठेवले आहे. प्रभू चव्हाण यांना पशुसंगोपन खात्यासह अल्पसंख्याक कल्याण खाते देण्यात आले होते. आता त्यांना हज आणि वक्‍फ खाते देण्यात आले असून श्रीमंत पाटील यांना वस्त्रोद्योग खात्याबरोबरच अल्पसंख्यांक कल्याण खातेही पाहावे लागणार आहे. शिवाराम हेब्बर यांना कामगार खाते देण्यात आले होते. आता त्यांना सी. टी. रवी यांच्याकडील अतिरिक्त साखर खाते देण्यात आले आहे. 

सुधारित खातेवाटप असे 
1. गोपालय्या : अन्न व नागरी पुरवठा 
2. आनंदसिंग : वन, पर्यावरण व जैवविज्ञान 
3. बी. सी. पाटील : कृषी 
4. शिवाराम हेब्बर : कामगार, साखर 
5. सी. सी. पाटील : खाण व वाणिज्य उद्योग 
6. श्रीमंत पाटील : वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक कल्याण 
7. प्रभू चव्हाण : हज व वक्‍फ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unwillingness in karnataka government