एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील पदे रिक्तच 

सदाशिव पुकळे
Monday, 15 February 2021

आटपाडी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात अनेक रिक्त पदे आहेत.  रिक्त पदे भरण्यास शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. परंतु

झरे (सांगली) :  आटपाडी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात अनेक रिक्त पदे आहेत.  रिक्त पदे भरण्यास शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. परंतु अध्याप रिक्त पदे भरण्यास परवानगी मिळाली नाही. तरी शासनाने तालुक्यातील मदतनीस, सेविका, पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची पदे ताबडतोब भरावीत अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांनी केली आहे.

सध्या तालुक्यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे पद रिक्त आहे. पर्यवेक्षिका चे 4 पदे, अंगणवाडी सेविका 2, मिनी अंगणवाडी सेविका 7, मदतनीस 29 पदे रिक्त आहेत.
तसेच मिनी अंगणवाडी चे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करण्यासाठी 29 अंगणवाड्या पात्र आहेत. त्यांचे प्रस्ताव लिंक द्वारे पाठवले आहेत. तसेच 47 अंगणवाड्याना स्वतंत्र इमारत नाहीत. 13 अंगणवाडी इमारतीसाठी जागा उपलब्ध नाही. तर 47 अंगणवाड्यांना जागा उपलब्ध आहे. 

हेही वाचा- चर्चा फक्त कारचा दरवाजा जोरात आदळ्याची: चंद्रकांतदादांचा जेवणाचा आग्रह संजयकाकांनी का मोडला?

सध्या नवीन इमारत मंजुरीसाठी  प्रस्ताव पाठवले आहेत 13 ठिकाणी जागा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे.तर 4 इमारतींना मंजुरी आली आहे.अनेक पदे रिक्त असल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी शासनाने सर्वच जागा भरण्यासाठी त्वरित मंजुरी द्यावी अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांनी केली आहे.

हेही वाचा-भाजपचे तीन आमदार, उपाध्यक्ष, सभापती फिरकलेच नाही: मात्र खासदाराच्या उपस्थितीमुळे चर्चेला उधाण

बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, सेविका, मिनी सेविका, मदतनीस यांची पदे रिक्त असल्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असून तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सरिता हुबाळे -प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी आटपाडी

आकडेवारी -

बाल प्रकल्प अधिकारी रिक्त - 1,

पर्यवेक्षिका मंजूर - 7  रिक्त - 3,

सेविका -191 रिक्त- 2,

मिनी सेविका मंजूर- 52 रिक्त -7,

मदतनीस मंजूर- 191 रिक्त- 29
 

मिनीचे अंगणवाडीत रूपांतर करणे 29 प्रस्ताव

47 ठिकाणी इमारत नाहीत, 13 ठिकाणी जागा उपलब्ध नाही.

नवीन इमारत 10 ठिकाणी प्रतीक्षा, 13 ठिकाणी जागा उपलब्ध तेसाठी प्रयत्न 4 ठिकाणी इमारत मंजूर

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vacancies in Integrated Child Development Services Scheme sangli marathi news