esakal | सांगलीत लसीसाठी रांगा; एकाच दिवशी 25 हजाराचे उच्चांकी लसीकरण

बोलून बातमी शोधा

null

सांगलीत लसीसाठी रांगा; एकाच दिवशी 25 हजाराचे उच्चांकी लसीकरण

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : सांगली जिल्ह्यात बुधवारी (21) एकाच दिवशी 24 हजार 952 एवढे आजवरचे उच्चांकी लसीकरण झाले आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे लसीसाठी आता रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यातील 377 केंद्रावरही सध्या लसीकरण सुरु आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी आणि महापालिका हद्दीत अशा तीन पातळ्यावर लसीकरणांचे नियोजन केले जाते.

जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून संथगतीने लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत पहिली आणि दुसरी अशा सुमारे चार लाख ऐंशी हजार लसी दिल्या आहेत. गेल्या महिन्यापासून लसीकरणाला वेग आला. लसीबद्दलचा विश्‍वास, कोरोनाची दुसरी लाट आणि 45 वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्या तुलनेत लस उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. राज्यासाठी प्रतिआठवडा 50 लाख लसीची गरज आहे. त्यात सांगली जिल्ह्याला किमान दोन लाखावर लसीकरणाची तयारी ठेवलेली आहे. कोरोनाची दुसरी लाटेत अकराशेवर रुग्ण आढळत आहेत. दररोजचे बळी 18 ते 22 आहेत. हा वेग झपाट्याने वाढतो आहे. कोरोना झपाट्याने वाढ अन्‌ बेडची उपलब्धता कठीण होते असल्याने लोक लसीसाठी रांगेत उभे राहिले आहेत.

  • बुधवारीच्या लसीकरण असे ( 21 एप्रिल)

  • जिल्हा आरोग्य अधिकारी - 19 हजार 159

  • महापालिका प्रशासन - 3669

  • नगरपालिका, नगरपंचायती - 2124

  • एकूण - 24, 952