वळसे-कागल महामार्गाचे सहापदरीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

सातारा - वळसे (सातारा) ते कागल (कोल्हापूर) या ९६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या पावसाळ्यानंतर सहापदरीकरणाचे काम सुरू होईल. त्यात सर्व ठिकाणी सेवारस्ते, आणखी एक लेन वाढविण्यासोबतच महामार्गाशेजारी गाड्या पार्किंगची ठिकाणे विकसित करणे, स्वच्छतागृहांची सुविधा केली जाणार आहे. 

पुणे ते शेंद्रे या १२५ किलोमीटर मार्गाचे सहापदारीकरणाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. काही ठिकाणी अद्याप उड्डाणपुलांची कामे अपूर्ण आहेत. या सहापदारीकरणाच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आता वळसे (सातारा) ते कागल (कोल्हापूर) या ९६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. मुळात वळसे ते कागल या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम चांगल्या प्रकारे झाले आहे. केवळ काही ठिकाणची सेवा रस्त्यांचीच कामे झालेली नव्हती. आता या मार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपयांच्या या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यात दोन ९०० कोटींची आणि एक ५०० कोटींचे टेंडर असून, ई- टेंडर प्रक्रियेद्वारे हे काम दिले जाणार आहे.

सहापदरीकरणातील ठळक वैशिष्ट्ये...
सेवारस्ते पूर्ण करून लेन वाढवणार
महामार्गाशेजारी वाहन पार्किंग सुविधा 
प्रथमच स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध
जिथे सिमेंट रस्ते तेथेच सिमेंटचे रस्ते
काही ठिकाणीच जमीन संपादन

Web Title: valase kagal highway development