वंदना वळवींना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांच्या लाचखोरीच्या प्रकरणातील दुसऱ्या संशयित गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. 

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुनीता गुरव यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. वेतनश्रेणी फरक बिल काढून ते मंजूर करण्यासाठी तक्रारदार शिक्षक हा गुुरव व वळवींना भेटला असता दोघांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यानंतर सोमवारी (ता. 7) लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरव यांना अटक केल्यानंतर वळवी फरार झाल्या होत्या. त्या मूळच्या सातारा जिल्ह्यातील असून त्यांचे सासर नंदुरबार असल्याने पोलिस तपासाला तिकडेही गेले. मात्र, तरीही पोलिसांना त्या सापडल्या नाहीत. अखेर आज दुपारी सापडल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला करत आहेत.

Web Title: Vandana Dalvi police custody