वसंतदादा पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

सांगली - माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सर्वस्तरातून आदरांजली वाहण्यात आली. कृष्णा तीरावरील वसंतदादांच्या समाधिस्थळी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील, वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

सांगली - माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सर्वस्तरातून आदरांजली वाहण्यात आली. कृष्णा तीरावरील वसंतदादांच्या समाधिस्थळी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील, वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

कृष्णा काठावरील समाधिस्थळी गोपाळकृष्ण भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, हिंदू आदी धर्मांच्या वतीने सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन केले होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आनंदराव मोहिते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विश्‍वास पाटील, श्रीमती जयश्री पाटील, महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाटगे, माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक सर्वश्री राजेश नाईक, संतोष पाटील, शेखर माने, उमेश पाटील, पांडुरंग भिसे, रोहिणी पाटील, प्रशांत पाटील, वंदना कदम, शेवंता वाघमारे, तासगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हणमंतराव देसाई, नूतन जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सिद्धार्थ जाधव, अमर पाटील, अय्याज नायकवडी, शहर महिला अध्यक्ष वहिदा नायकवडी, कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, विक्रम पाटील सावर्डेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील वसंतदादांच्या पुतळ्याला चेअरमन विशाल पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, ज्येष्ठ संचालक संपतराव माने यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक संजय पाटील तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य कार्यालयातही वसंतदादांना आदरांजली वाहण्यात आली. बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या हस्ते वसंतदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बॅंकेचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. रामदुर्ग, उपव्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Vasantdada Patil's death anniversary tribute