वसंतदादांच्‍या नातवाचे शक्तीप्रदर्शन कशासाठी ?

महाराष्ट्राच्या राजकारण सांगलीतून फिरवणाऱ्या वसंतदादांच्या स्मृतीस्थळी पुन्हा एकदा दादा गटाचे जिल्हाभरातील निष्ठावान उद्या एकत्र
विशाल पाटील
विशाल पाटील sakal

सांगली : महाराष्ट्राच्या राजकारण सांगलीतून फिरवणाऱ्या वसंतदादांच्या स्मृतीस्थळी पुन्हा एकदा दादा गटाचे जिल्हाभरातील निष्ठावान उद्या (ता.१) एकत्र येत आहेत. प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर आलेले दादांचे नातू विशाल पाटील यांनी त्यासाठी हाक दिली आहे. यापुर्वी लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेस नव्हे तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर शड्डू ठोकण्याआधी असाच मेळावा दादांच्या स्मृतीस्थळी घेतला होता. या मेळाव्यातून त्यांनी राज्यातून लक्ष वेधले होते.

विशाल पाटील
बाप्पाच्या मूर्तीत डोळ्यातून जिवंतपणा आणणारे 'लिखाई' कारागीर; पाहा व्हिडिओ

वसंतदादांचे नातू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील सार्वजनिक जीवनातून गायब झाले आहे. त्याचवेळी धाकटे नातू विशाल पाटील मात्र अधिक जोरकसपणे सक्रीय आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना ऐनवेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणुकीत उतरावे लागले. तरीही त्यांनी ३ लाख ४४ हजार इतकी लक्षवेधी मते घेतली. त्यावेळी त्यांची लढायची इच्छाच नव्हती. विश्‍वजीत कदम यांनी दादा घराण्याला उमेदवारी नको असेल तर जागा स्वाभीमानीला द्या असा पवित्रा घेतला. त्यामुळे ते रिंगणात उतरले. दादा घराण्याची कोंडी होतेय असा त्यांचा पवित्रा त्यावेळी होता.

विशाल पाटील
कुपवाडातील महिलेच्या खूनप्रकरणी सांगलीच्या एकला अटक

स्वाभीमानीची आणि काँग्रे-राष्ट्रवादीशी आघाडी होती. मात्र या निवडणुकीत पराभव पदरी आला तरी वसंतदादा घराण्याला राजकारणात टिकून राहण्यासाठी उर्जाच मिळाली. विशाल पाटील यांना सांगली विधानसभा जागेवर अधिक रस आहे. मात्र आता या जागेवर प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वसंतदादाचे सहकारी गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांचा प्रबळ दावा आहे. त्यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अवघ्या पाच हजारांच्या फरकाने पराभव झाला आहे. आणि शिवाय ते सध्या पुर्ण ताकदीने मतदारसंघात फिरत पक्ष बांधणी करीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला उमेदवारीवर विशाल आणि पृथ्वीराज असा दोघांचाही दावा असेल. यात कै. विष्णूअण्णांच्या स्नुषा व कै. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचा दावाही प्रबळ असेल. विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी पुन्हा वसंतदादा घराण्यात खेचणे हे उद्याच्या मेळाव्याचे तातडीचे नव्हे तर लांबचे उद्दीष्ठ आहे. मात्र काही जवळची उद्दीष्ठे ठेवून उद्याचा मेळावा होत आहेत.

विशाल पाटील
नेत्यांपुढे वडेट्टीवारांनी जोडले हात! म्हणाले, ओबीसीतील हिस्सा मागू नका

त्यात पहिले उद्दीष्ठ वसंतदादा घराण्यावर काँग्रेसने अन्याय केला तरी आम्ही काँग्रेससोबतच आहोत हे ठसवण्याचा उद्याच्या मेळाव्याचा ताजा हेतू आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळावे असा विशाल यांचा प्रयत्न होता. मात्र विश्‍वजीत कदम यांनी गेल्या वीस वर्षापासून आपल्या गटाकडे असलेले हे पद कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी विशाल यांना संधी दिली आहे. ती त्यांनी नाराजीनेच स्वीकारली आहे. ही नाराजी या मेळाव्यात व्यक्त होऊ शकते. याबरोबरच दुसरे उद्दीष्ठ सांगली मिरज तालुक्यात वसंतदादा गटाची विस्कटलेली राजकीय घडीही बसवण्याचे असेल.

विशाल पाटील
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना साद

जिल्ह्यातील सर्व सत्ताकेंद्रातून दादा घराणे हद्दपार झाले आहे. आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी जयंत पाटील यांनी जोरदार घरवापसीची मोहिम सुरु केली आहे. छोटे छोटे कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. विशेषतः मिरज पूर्व भागातील वसंतदादा आणि मदन पाटील गटातील अनेक कार्यकर्ते आता राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा गटाची मोर्चेबांधणी करण्याचाही हा प्रयत्न असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com