बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भाजीविक्री

शेतकऱ्यांचे लक्षवेधक आंदोलन; खासगी भाजी मार्केट बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी
Vegetable sales in front of Collector office agitation of farmers Vegetable market closed Belgaum
Vegetable sales in front of Collector office agitation of farmers Vegetable market closed Belgaumsakal

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भाजी विक्री करून अनोखे आंदोलन केले. सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरु झालेले आंदोलन दुपारपर्यंत चालले. यावेळी एपीएमसी वाचवा, शहरातील दुसरे खासगी भाजी मार्केट बंद करा, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव द्या, आदी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यभरातील सुमारे दोनशे व्यापारी व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

बेळगावात एपीएमसी भाजी मार्केटमध्ये सुमारे दोन वर्षापूर्वी भाजी मार्केट सुरु करण्यात आले आहे. यातून सरकारला मोठ्या प्रमाणात कर (सेस) जातो. मात्र, बेळगावात एक भाजी मार्केट असताना दुसरे खासगी भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. याचा सरकारलाही तोटा आहे. यामुळे गांधीनगर येथे सुरु केलेले दुसरे भाजी मार्केट बंद करावे. तसेच पिकांना योग्य हमीभाव देण्यासाठी एक कमिटी स्थापन करावी. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घेतले आहेत. राज्य सरकारनेही हे कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही केली.

यापूर्वी बेळगावात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार अभय पाटील यांच्या घरासमोर भाजी विक्री करून आंदोलन करण्यात आले होते. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सिद्धगौडा मोदगी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सतीश पाटील, विजय पाटील, असिफ कलमनी, जावेद सनदी आदी व राज्यातील विविध शेतकरी संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

अडीच महिन्यांपासून आंदोलन

खासगी भाजी मार्केट बंद करावे, या मागणीसाठी एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापारी एपीएमसी आवारात आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला अडीच महिने पूर्ण झाले आहेत. दोन फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यासंबंधी अनेकवेळा राज्य सरकार व प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. मात्र, त्यांनीही दुर्लक्षच केला असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून लोकप्रतिनिधींच्या घरामोर भाजी विकून आंदोलन केले जात आहे. मात्र, चक्क सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com