वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाहनांची तपासणी

राजकुमार शहा 
रविवार, 22 जुलै 2018

मोहोळ : पंढरपूर येथील आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर मोहोळ येथील शिवाजी चौकात मोहोळ पोलीसांनी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीचा फास आवळला असून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विक्रम बोधे यांनी दिली.

मराठा धनगर व कोळी समाज आपल्या मागण्यांवर आक्रमक आहेत. पंढरपूर येथे चालु वर्षी वारीला नेहमीपेक्षा जादा भावीक आले आहेत. वारीत कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन पंढरपूरला जाणारी वाहने तपासण्यात येत आहेत.

मोहोळ ते पंढरपूर या चौतीस किमीच्या मार्गावर वारकरी सुरक्षेसाठी पोलीस गस्तीच्या जादा फेऱ्या वाढवील्या आहेत. तर याच मार्गावर प्रथमच जागोजागी तीन ते चार पोलीसांची पथके तैनात केली आहेत. दरम्यान टाकळी सिकंदर परिसरासह कुरणवाडी शेटफळ आदी ठिकाणी बस गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. दरम्यान अंदोलकांच्या शोधासाठी टाकळी सिकंदर चौकातील ज्या ज्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Vehicle inspection for Warkaris safety