पशुसेवेच्या शतकी परंपरेची इंडिया रेकॉर्डकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सांगली - संस्थानकाळात पहिला पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणारे आणि शतकभरापुर्वी सांगलीतून पहिली पशुवैद्यक शास्त्रातील सर्जन म्हणून पदवी मिळवणारे डॉ.नारायण तातो कुलकर्णी यांची पणती तेजश्री हिने यंदा याच विद्याशाखेत पदवी घेतली. नारायण तातो यांचे चिरंजीव केशव आणि त्यांचे चिरंजीव मिलिंद आणि आता तेजश्री अशी तब्बल चार पिढ्यांची पशुसेवेची परंपरा कायम आहे. कुलकर्णी कुटुंबाच्या या अनोख्या कामगिरीची दखल इंडिया रेकॉर्ड बुकने घेतली आहे. 

26 जून 1918 रोजी तत्कालीन बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज मधून नारायण तातो यांनी पदवी घेतली. त्या काळात सांगलीतील ते पहिलेच व्हेटरनरी सर्जन त्या काळात घोडा या पशुला खूप महत्व असायचे. साहजिकच या शाखेचे संशोधन घोड्याभोवती फिरायचे. नारायण तातो यांचीही घोड्याच्या संगोपनात मास्टरी होती. त्यांनी पहिल्या महायुध्दात ब्रिटीश फौजेतून सैन्याचा भाग म्हणून चीनमध्ये गेले होते. तिथून परतल्यानंतर ते सांगली संस्थानचे पागाअधिकारी म्हणून अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांचे चिरंजीव केशव यांनीही 1954 मध्ये याच कॉलेजमधूनच पदवी घेतली. त्यांनी तत्कालीन मुंबई प्रातांतील गुजरात आणि महाराष्ट्रात नोकरी केली. सांगली जिल्ह्यातील जुनोनी येथील खिलार पशुपैदास केंद्रात 1972 च्या दुष्काळात त्यांनी विशेष कामगिरी बजावली. शासनस्तरावरत्‌ त्यांनी पहिल्यांदा चारा छावणीची संकल्पना राबवली. सुमारे सहा महिने पाच हजार जनावरांची छावणी शासनाने चालवली. राष्ट्रपती सन्मानपत्राद्वारे गौरव झालेल्या कुलकर्णी यांचा शासनाने थेट उपसंचालक पदोन्नतीने गौरव केला. 

केशव नारायण यांचे चिरंजीव मिलिंद यांनी 1981 मध्ये बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमधूनच पदवी घेतली. कोल्हापूर येथून नोकरीस प्रारंभ करताना त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सेवा केली. त्यांनी कोकणातून सहाय्यक आयुक्त म्हणून 2016 मधून निवृत्ती घेतली. कुलकर्णी कुटुंबियांची पशुवैद्यकीय क्षेत्रातील सेवेची ही परंपरा सांभाळण्यासाठी आता पुढच्या पिढीची प्रतिनिधी व मिलिंद यांची कन्या तेजश्री हिने नुकतीच उदगीरच्या महाविद्यालयातून याच शाखेतून पदवी घेतली.

1918 ते 2018 अशा गेल्या शतकभरात कुलकर्णी कुटुंबातून सलग चार पिढ्यांनी पशुवैद्यक शास्त्रातील पदवी पदव्युत्तर शिक्षण घेत आगळावेगळा विक्रम नोंदवला आहे. 

Web Title: Veteran century tradition Interference by India Record