खून करून युवकाचा मृतदेह जाळला 

खून करून युवकाचा मृतदेह जाळला 

सातारा - किरकोळ वादातून युवकाचा खून करून मृतदेह पेटवून देण्याचा निर्घृण प्रकार आज सकाळी चाहूर फाटा (पिरवाडी) परिसरात उघडकीस आला. अत्यंत क्रूरपणे केलेल्या या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन जणांना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

मंदार ऊर्फ बबूल प्रदीप नगरकर (वय 32, लक्ष्मी टेकडी, पाण्याच्या टाकीजवळ, सदरबझार) असे मृत युवकाचे नाव आहे. अमीर इम्तीयाज मुजावर (वय 20), अनुप इंद्रपाल कुरेल (वय 19) व अनिकेत बाळासाहेब माने (वय 20, रा. सर्व रा. पिरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तो व त्याच्या आईसोबत राहात होता. गवंडी काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. काल (ता. 3) कामाला सुटी होती. दुपारी त्याने ठेकेदाराकडून पैसे घेतले. त्यानंतर तो घरी आला होता. सायंकाळी चारनंतर तो घराबाहेर पडला होता. बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या परिसरात शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. याच परिसरातील बिअर शॉपीजवळ मंदार मद्यपान करत होता. त्या वेळी त्याचा संशयितांबरोबर किरकोळ वाद झाला. त्यानंतर तो स्पर्धेच्या ठिकाणी गेला. संशयितही तेथे आले होते. स्पर्धेच्या ठिकाणाजवळ त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने संशयितांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवर बसवून त्याला चाहूर फाट्यावर नेले. तेथे लाथाबुक्‍या व दगडाने ठेचून त्याचा खून केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून मंदारच्या मृतदेहावर टाकून तो पेटवून दिला. मृतदेहाचे ओळखपटू नये, यासाठी हे क्रूर कृत्य त्यांनी केले. 

चाहूर फाटा परिसरात आज सकाळी एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, शहर पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याच्या सूचना वरिष्ठांनी शहर व एलसीबीच्या अधिकाऱ्यांना दिले. पूर्ण जळाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे संशयित शोधणे तर आणखी कठीण होते. अशा परिस्थितीत एलसीबीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने डोके लावून मृताबरोबरच संशयितांचीही ओळख पटली. अवघ्या आठ तासांत त्यांनी गुन्हेगारांना जेरबंद केले. उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार विजय शिर्के, उत्तम दबडे, आनंदराव भोईटे, कांतिलाल नवघणे, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, विशाल पवार व गणेश कचरे या कारवाईत सहभागी होते. 

नो कॉम्प्रमाईज ओन्ली ठोके 
पकडलेल्या संशयितांनी अत्यंत क्रूर वर्तन केले आहे. एवढ्या लहान वयातही त्यांनी केलेल हे कृत्य तरुणाई कोणत्या दिशेने चालली हे दाखवते. त्यांनी तयार केलेल्या व्हॉटर ऍप ग्रुपचे नावही "नो कॉम्प्रमाईज, ओन्ली ठोके' असे ठेवलेले होते. त्यातूनही त्यांची मानसिकता स्पष्ट होते. खून केल्यानंतर सर्व जण बिनधास्त घरी जाऊन झोपले होते. पोलिस दुपारी पकडायला गेले. तेव्हाही ते घरी होते. पोलिसांनी पकडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर पश्‍चाताप जाणवत नव्हता. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com