कर्नाटकात मद्य विक्रीवर निर्बंध ; हॉटेल्स, धाब्यावर कारवाईचा इशारा

जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूसह बेकायदा दारू विक्रीचे व्यवसाय तेजीत सुरू आहेत.
alcohol
alcoholesakal
Updated on: 

बेळगाव : विधानपरिषद निवडणूकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर मद्यविक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अबकारी खाते सतर्क झाले असून बेकायदेशीररित्या मध्य विक्री करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. हॉटेल्स आणि धाब्यामध्ये ग्राहकांना मध्य प्राशन करण्यास देखील निर्बंध लादण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूसह बेकायदा दारू विक्रीचे व्यवसाय तेजीत सुरू आहेत. कोणत्याही प्रकारचा मद्य विक्री परवाना नसताना देखील अनेक ठिकाणी खुलेआम दारूची विक्री केली जात आहे. त्यामुळे परवानाधारक दुकानदारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अबकारी खात्याच्यावतीने बेकायदा दारू विक्री व्यवसायात गुंतलेल्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गोवा आणि लष्करी कोठ्यातीळ दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बेकायदा मद्य विक्री व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच विधान परिषदेची निवडणूक घोषित झाल्याने जिल्ह्यात आचारसंहिता जारी झाली आहे. त्यामुळे निवडणूक काळात जिल्ह्यातील हॉटेल्स आणि धाब्यामध्ये ग्राहकांना मद्य प्राशन करण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच हॉटेल्स आणि धाब्यामध्ये तपासणी देखील केली जात आहे. एकाधा ठिकाणी बेकायदेशीररित्या मध्य व्यवसाय सुरू असल्यास ती माहिती अबकारी खात्याच्या कंट्रोल रूमला दिल्यानंतर संबंधितावर तातडीने कारवाई केली जात आहे. तसेच अबकारी अधिकारी सातत्याने शहरासह ग्रामीण भागात गस्त घालत आहेत.

alcohol
शिवसेना नेत्यांच्या उधळपट्टीवर राणे भडकले; दौऱ्याला जाताय की....

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी जारी केला आहे. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना अबकारी खात्याला करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर १४ तारखेला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी.

निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात व्हावी. यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ८ डिसेंबरला सायंकाळी ४ ते १० डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याची सूचना केली आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी १४ तारखेला देखील मद्य विक्री दुकाने बंद राहणार आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी अबकारी खात्याला केली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com