कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत 38.76 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा ही मतदार संघात चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारनंतर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडासह पाऊस होत असल्याने मतदारांनी यावेळी सकाळीच मतदान करणे पसंत केले.

कोल्हापूर -  विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा ही मतदार संघात चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारनंतर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडासह पाऊस होत असल्याने मतदारांनी यावेळी सकाळीच मतदान करणे पसंत केले. जिल्ह्यात दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत 38.76 टक्के मतदान झाले आहे.

यामध्ये सर्वाधिक कागल तालुक्‍यात 44.9, तर शाहुवाडी विधानसभा मतदार संघात 42 टक्के मतदान झाले आहे. राज्यात झालेल्या मतदानाच्या तुलनेते कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी 1 वाजून 10 मिनिटापर्यंत झालेले एकूण मतदान 
मतदार संघ* टक्केवारी 
चंदगड - 35.76 
राधानगरी - 44.24 
कागल -44.24 
कोल्हापूर दक्षिण -35 
करवीर - 41.67 
कोल्हापूर उत्तर - 30.38 
शाहुवाडी -42 
हातकणंगले -39.5 
इचलकंरजी - 31.95 
शिरोली - 37 

राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यातील आतपर्यंत झालेले मतदान : 
कोल्हापूर - 38.14 
सांगली - 18.57 
सिंधुदूर्ग - 27.07 
रत्नागिरी - 24.07 
सातारा - 17.37 
पुणे - 18.95 
रायगड- 19.52 
नागपूर - 24.78 
मुंबई शहर - 15.71 
मुंबई -16.84 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 39 percent Voting in Kolhapur till 1