Vidhan Sabha 2019 : भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे 

Vidhan Sabha 2019 : भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे 

सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

सांगली विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी आज डॉ. सावंत सांगलीत आले होते. त्यावेळी गणेशनगरमधील रोटरी हॉलमध्ये समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, बुध्दीवंतांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भाजपच्या प्रज्ञा सेलचे प्रदेश संयोजक डॉ. शिरीष देशपांडे, महापौर संगीता खोत, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, दीपक शिंदे उपस्थित होते. 

डॉ. सावंत म्हणाले, गेल्या 60 वर्षात काँग्रेसची एकही योजना अंत्योदय तत्वावर चालणारी नव्हती. त्यांनी स्वार्थासाठी राजकारण केले. 2014 मध्ये देशात परिवर्तन झाले. नवा भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारा दिला. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत आहेत. गेल्या पाच वर्षात विरोधकांनी त्यांच्यावर आरोप करण्यासारखा एकही डाग नाही. 

ते म्हणाले, मूलभूत सुविधा तयार होण्यासाठी वेळ लागतो. भाजप सरकारने 80 हून अधिक योजना लोकांसाठी राबवल्या. या योजना लोकांपर्यंत पोचल्याशिवाय विकास दिसणार नाही. आर्थिक मागासवर्गासाठी आरक्षण महत्वाचे होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणले. कार्पोरेट टॅक्‍स कमी केला. पर्यटनावरील जीएसटी 28 वरुन 18 टक्‍क्‍यांवर आणला. कलम 370 रद्द केले. त्यामुळे भारताची अखंडता टिकून राहिली, असे ते म्हणाले.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापुराच्या काळात शासनाकडून पूरग्रस्तांसाठी मदत मिळवून दिली. मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यांना पुन्हा निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी जीपी फोरमच्या डॉ. भारती शिंदे, कृष्णा व्हॅली ऑफ चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी मनोगत व्यक्त केले. प्रज्ञा सेलचे सांगली संयोजक संजय परमणे यांनी स्वागत केले. यावेळी क्रेडाईचे प्रमोद शिंदे, महापालिका कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशनचे विजय पाटील, आयएमएचे अध्यक्ष डॉ. रणजित जाधव, सांगली स्पोर्टस फौंडेशनचे सचिव एस. एल. पाटील, केमिस्ट असोसिएशनचे विनायक शेटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

शस्त्रपूजन ही संस्कृती 
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावरुन सध्या सुरु असलेल्या वादाबद्दल बोलताना ते म्हणाले, शस्त्रपूजन ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे राफेल या संरक्षणासाठी घेतलेल्या विमानाची पुजा करण्यात गैर काय? तो एक संस्कृतीचा भाग आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com