Vidhan Sabha 2019 : कागलसह चंदगड लढण्याचा जनता दलाचा निर्धार 

Vidhan Sabha 2019 : कागलसह चंदगड लढण्याचा जनता दलाचा निर्धार 

गडहिंग्लज - कागल आणि चंदगड या दोन्ही मतदारसंघांची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार आज झालेल्या जनता दलाच्या मेळाव्यात केला. आमचा पराभव करू, असे म्हणणाऱ्यांना ताकद दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून त्यासाठी संघटित ताकदीने लढण्याचे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. श्रीपतराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.

भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे शिक्षण समूहाच्या आवारात मेळावा झाला. प्रधान सचिव शिवाजी परुळेकर, मधू पाटील, नगराध्यक्षा स्वाती कोरी, सदानंद व्हनबट्टे, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ऍड. शिंदे म्हणाले, ""एकीकडे गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीचे चित्र असताना दुसऱ्या बाजूला पूरग्रस्तांचे प्रश्‍नही गंभीर झाले आहेत. धर्मांध शक्तीला हटवण्यासाठीच जनता दल रिंगणात उतरणार आहे. कागल व चंदगडमधून पक्षातर्फे कोणीही उमेदवार असतील. त्यांच्या पाठीशी राहावे. वर्षानुवर्षे चळवळीतून अनेक प्रश्‍नांची निर्गत केली. आमदार असताना शेकडो प्रश्‍नांवर विधानसभेत आवाज उठविला.'' 

स्वाती कोरी म्हणाल्या, ""जनता दल नेहमी सामान्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरला. पक्षाला सत्तेची दुकाने नको आहेत. सन्मान हवा आहे. पक्षाची मूल्ये ठरलेली आहेत. या मूल्यांवर विश्‍वास ठेवूनच निष्ठावंत कार्यकर्ते घडले आहेत. आता विधानसभा लढायची की नाही, हे कार्यकर्त्यांनी ठरवावे.'' 

श्री. परुळेकर यांनीही पक्ष देईल त्याच्या मागे राहून यश खेचून आणण्याचे आवाहन केले. बाळेश नाईक, काशिनाथ देवगोंडा, दत्ता मगदूम, अजित शिंदे, नरेंद्र भद्रापूर, बापू म्हेत्री, सदानंद व्हनबट्टे, हिंदूराव नौकूडकर, जयसिंगराव देसाई आदींची भाषणे झाली. नगरसेविका क्रांती कुराडे यांनी आभार मानले. उदय कदम, बाळासाहेब मोरे, राम मजगी, महेश कोरी, सुभाष देसाई, संभाजी शिंदे, सुनीता पाटील, श्रीपती कदम, बाबासाहेब पाटील, भीमराव पाटील, सतीश कोळेकर, सरपंच स्वाती शिंदे, रमेश मगदूम, शशिकांत चोथे, संभाजी कुराडे आदी उपस्थित होते. 

उमेदवारीला स्पर्श 
ऍड. शिंदे यांनी भाषणात स्वाती कोरी, बाळेश नाईक यांच्या नावांचा उल्लेख उमेदवारीसाठी करून चंदगडमधूनही एखादा चेहरा उमेदवारीसाठी येऊ शकतो, असे सूतोवाचही केले. कोणीही रिंगणात असल्यास त्यांच्यामागे ठामपणे राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान, तालुकाध्यक्ष श्री. नाईक यांनी शरद पवार यांच्यावरील "ईडी'च्या कारवाईचा निषेध नोंदवला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com