Vidhan Sabha 2019 : शाहुवाडीतून महायुतीतर्फे सत्यजित पाटील यांचा अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

बांबवडे - शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार सत्यजित पाटील यांनी आज महायुतीकडुन उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरतेवेळी शक्ती प्रदर्शन केल्यास वाहतूक कोंडी होते. कार्यकर्त्यांची धावपळ होते ते टाळण्यासाठी आमदार पाटील यांनी अगदी साध्या पद्धतीने अर्ज भरला. 

आमदार पाटील म्हणाले, विकास कामांच्या जोरावर या निवडणूकीत जनतेच्या समोर मी जाणार आहे. विकासकामांमुळे विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दाच नाही. त्यामुळे विरोधक पोकळ आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. 

रणविरसिंग गायकवाड म्हणाले की, केलेली विकास कामे व जनतेचा संपर्क हिच आमदार सत्यजित पाटील यांची ताकद आहे. याच्या जोरावरच त्यांचा विजय निश्चित होणार याची मला खात्री आहे. 

शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, भाजपचे राष्ट्रीय सदस्य राजु प्रभावळकर, कोतोलीचे माजी पोलीस पाटील मुरारी पाटील, गोकुळचे संचालक विलास पाटील, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, युवराज पाटील, डी. जी. पाटील,  बाबासाहेब पाटील जाफळेकर, दाजी चौगुले, संजय पोवार, जि. प. सदस्य विजय बोरगे, शिवसेना जिल्हा उप्रमुख नामदेव गुरू, हंबीरराव पाटील, सुरेश बेनाडे, अविनाश चरणकर, विजय रेडेकर, माजी सरपंच शिवाजी सांगळे, संजय ठाणेकर, विष्णू पाटील, बाजीराव पाटील, एम. के. पवार उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 MLA Satyajeet Patil fill form from Shahuwadi