Vidhan Sabha 2019 : सांगलीचा कल अकराला; तर निकाल तीनपर्यंत शक्‍य

Vidhan Sabha 2019
Vidhan Sabha 2019

सांगली - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी गुरुवारी (ता. २४) सकाळी आठ वाजता संबंधित मतमोजणी केंद्रावर सुरू होईल. निकालाचा कल सकाळी अकरा वाजता, तर दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. जिल्ह्यातील ६८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालेले आहे.

जत विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीला १६ टेबल आणि अन्य मतदारसंघांत २० टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होणार आहे. सर्वच मतदारसंघांत मतदान केंद्राच्या प्रमाणात १५ ते १८ फेऱ्यांत निकाल अपेक्षित आहे. सुरुवातीला पोस्टल तर शेवटी प्रत्येक विधानसभानिहाय प्रत्येकी पाच केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मतमोजणी होईल. 

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात २३ लाख ७६ हजार ९०२ मतदारांपैकी सुमारे ६६.३५ टक्के मतदान झाले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होईल. प्रथम टपाली मतदानांची मोजणी होईल. त्यामध्ये निवडणूक कर्मचारी, सैनिक मतदार यांचा समावेश असेल. त्यानंतर पहिली फेरी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत शक्‍य आहे. त्यानंतर प्रत्येक ३० मिनिटाला एक फेरी याप्रमाणे निकाल जाहीर होतील.

निकालाचा कल सर्वसाधारण ११ वाजता तर संपूर्ण निकाल तीन वाजेपर्यंत शक्‍य आहेत. चुरशीच्या मतदारसंघात निकालासाठी अगदी शेवटच्या फेरीपर्यंतही वाट पहावयास लागू शकेल, अशी जिल्ह्यातील परस्थिती आहे.

संबंधित मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होईल. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय किमान २०० म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासाठी दोन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभेपैकी जत विधानसभेसाठी प्रत्येक फेरीसाठी १६ टेबल, तर अन्य सर्व मतदारसंघांची मतमोजणी २० टेबलवर केली जाणार आहे. साधारण १५ ते १८ फेऱ्यांत संपूर्ण निकाल जाहीर होईल.

मतमोजणी केंद्राची ठिकाणे अशी

  •     मिरज - शासकीय नवीन         धान्य गोदाम (वैरण बाजार) 
  •  सांगली ः तरुण भारत         व्यायाम मंडळ
  •     इस्लामपूर ः शासकीय         धान्य गोदाम 
  •     शिराळा ः औद्योगिक         प्रशिक्षण संस्था 
  •     पलूस-कडेगाव ः             आयटीआय बिल्डिंग
  •     खानापूर ः शासकीय धान्य         गोदाम
  •     तासगाव-कवठेमहांकाळ ः         प्रशासकीय इमारत
  •     जत ः शासकीय धान्य         गोदाम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com