Vidhan Sabha 2019 : पलूस कडेगावातून संजय विभूते शिवसेनेचे उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कडेगाव - शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेकडून एबी फॉर्म घेतला. त्यामुळे पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघातून संजय विभूते यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

कडेगाव - शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेकडून एबी फॉर्म घेतला. त्यामुळे पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघातून संजय विभूते यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

महायुतीच्या जागा वाटपात पलूस-कडेगाव हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी केलेले भाजपचे युवा नेते व  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. त्यांनी भाजपची उमेदवारी मिळाली तरच निवडणुक लढविणार असा निर्णय त्यांनी  घेतला होता. 

त्यामुळे येथे शिवसेनेकडून निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेले संजय विभूते यांना आज उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. काही वेळातच त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर होईल.

यावेळी शिवसेनेचे सांगली-सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मोहिते,तालुका प्रमुख नितीन शिंदे आदी उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan sabha 2019 Sanjay Vibhute contestant from Shivsena from Palus Kadegaon