सांगली भाजपमध्ये आमदारांविरुद्ध 'हे' तगडे इच्छुक

सांगली भाजपमध्ये आमदारांविरुद्ध 'हे' तगडे इच्छुक

सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तालमीत शड्डूंचा आवाज आता ताकदीने घुमत असून आज आठही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखतींचा पहिला फेर पार पडला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी वन टू वन मुलाखती घेतल्या. त्यात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीला माजी आमदार दिनकर पाटील यांनी तर शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या उमेदवारीला सम्राट महाडिक या युवा नेत्याने आव्हान दिले आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यात दुपारी दोन वाजल्यापासून मुलाखतींना सुरवात झाली. त्याआधी पक्षाच्या शिस्तपालनाविषयीचे पुस्तकच वाचून दाखवण्यात आले. त्यानुसार, कोणतेही शक्तीप्रदर्शन करायचे नाही, कार्यकर्त्यांची गर्दी करायची नाही, कुणाच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचायचा नाही, मला उमेदवार का हवी, एवढेच सांगायचे, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे इच्छुक आणि मोजके समर्थक एवढ्यांची गर्दी होती. त्यात विद्यमान चार आमदारांना आव्हान कोण देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. 

सांगली मतदार संघातून आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर माजी आमदार दिनकर पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आणि जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी आव्हान उभे केले आहे. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या उमेदवारीला विरोध करत वातावरण निर्मिती करणाऱ्या सम्राट महाडिक यांनी आपली बाजू ताकदीने मांडली. बंधू राहूल महाडिक यांच्यासमवेत जावून त्यांनी मुलाखत दिली. 
जत मतदार संघात विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्यासमोर जिल्हा परिषद सभापती तम्मनगौडा रविपाटील, डॉ. रवींद्र आरळी यांनी आव्हान उभे केले आहे. 

संजयकाकांच्या "गृहमंत्री' इच्छुक 

खासदार संजय पाटील यांच्या होम पिचवर तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले जात होते. परंतू, आता खासदार संजय पाटील गटानेच त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. संजयकाकांच्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासाठी या मतदार संघातून आज उमेदवारी मागण्यात आली. त्यामुळे खासदार पाटील विरुद्ध घोरपडे ठिणगी पडणार का, अशी कुजबुज सुरु झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com