Vidhansabha2019 : कोल्हापूर ‘उत्तर’मधून दौलत देसाई काँग्रेसचे प्रबळ दावेदार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून दौलत देसाई हे काँग्रेसकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार बनले आहेत. मध्यंतरी आमदार सतेज पाटील गटात याच कारणासाठी त्यांनी प्रवेश केला होता.

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून दौलत देसाई हे काँग्रेसकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार बनले आहेत. मध्यंतरी आमदार सतेज पाटील गटात याच कारणासाठी त्यांनी प्रवेश केला होता.

सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेवेळी दौलत देसाई यांचे शुभेच्छा फलक नजरेस पडतात. विधानसभा निवडणूक लागली की, दरवेळी देसाई यांच्या नावाची चर्चा असते. गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी निवडणुकीची तयारीही केली; मात्र निवडणुकीला सामोरे गेले नाहीत. कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात गेले.

मधुरिमाराजे यांची निवडणूक लढविण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे देसाई प्रबळ दावेदार बनले आहेत. त्यांनी पूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काही कार्यकर्त्यांनी कोकण दौऱ्याचा आस्वादही घेतला. आमदार क्षीरसागर यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार नसल्याने देसाई यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. काँग्रेसची आघाडी झाल्यास देसाई हेच उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. २००४ ला मालोजीराजे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. २००९ ला त्यांचा पराभव झाला. २०१४ ला नगरसेवक सत्यजित कदम यांनी निवडणूक लढविली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Doulat Desai contest from congress in Kolhapur North