Vidhansabha 2019 : कागलमधून शिवसेनेकडून यांना आहे लढायचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

...तर अंबरिश विधानसभेच्या रिंगणात
विधानसभा निवडणूक काही कार्यकर्त्यांमधून मी लढवावी, असा मतप्रवाह आहे, तर युवक, कार्यकर्त्यांची शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांनी लढवावी, असा सूर आहे. माझी थांबायची तयारी असून, अंबरिशला उभे करण्यास माझी हरकत नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ, असे आश्‍वासन श्री. घाटगे यांनी दिले.

म्हाकवे - ‘सर्वसामान्य गरीब जनता आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या जिवावरच राजकारणात २० वर्षे लढत राहिलो. खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या साथीने शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक जोमाने लढवायची असून, कुणापुढेही गुडघे टेकणार नाही,’ असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.

अन्नपूर्णा शुगर ॲण्ड जॅगरी वर्क्‍स लि. केनवडे कारखान्याच्या कामाची प्रगती, नवीन शेअर्स आणि ऑक्‍टोबर २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी म्हाकवे (ता. कागल) येथे झालेल्या कार्यकर्त्यांचा बैठकीत ते बोलत होते. ए. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी एम. बी. पाटील, विश्‍वासराव दिंडोर्लेकर, मल्हारी पाटील, आकाराम पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

श्री. घाटगे म्हणाले, ‘‘कोणतीही सत्ता नसताना गोरगरीब जनतेच्या पाठबळावरच श्री अन्नपूर्णा शुगरची उभारणी होत आहे. अन्य कारखान्यासारखाच दर देण्याचा प्रयत्न करू, कारखाना उभारणीत योगदान असणाऱ्या भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देऊ.  

या कारखान्यात उत्पादित होणारी गूळ पावडर व साखर ही केमिकलविरहित असल्याने आरोग्यास उत्तम आहे. भविष्यात नफ्यातील योग्य लाभ सभासदांना देऊ.’’

सुनील पाटील यांनी  स्वागत केले. यावेळी सिद्राम गंगाधरे, ए. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन पाटील, आनंदराव पाटील, बाळासो रोड्डे, अनिल पोवार, महादेव चौगुले उपस्थित होते. अजित माळी यांनी आभार मानले.

आषाढीच्या मुहूर्तावर मतदारसंघात दौरा
आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत संजय घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला. त्यांनी  कुरणी, भडगाव, मळगे बुद्रुक, मळगे खुर्द, बानगे, आणूर आणि म्हाकवे गावांचा दौरा करत कारखाना उभारणीसाठी एक महिना झपाटून वेळ द्या. मग विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

...तर अंबरिश विधानसभेच्या रिंगणात
विधानसभा निवडणूक काही कार्यकर्त्यांमधून मी लढवावी, असा मतप्रवाह आहे, तर युवक, कार्यकर्त्यांची शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांनी लढवावी, असा सूर आहे. माझी थांबायची तयारी असून, अंबरिशला उभे करण्यास माझी हरकत नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ, असे आश्‍वासन श्री. घाटगे यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Kagal constituency sanjay Ghatge comment