Vidhansabha 2019 : पी. एन. पाटील, आवाडे काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक

Vidhansabha 2019 : पी. एन. पाटील, आवाडे काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी ४८ पैकी २३ इच्छुकांचे अर्ज प्रदेश काँग्रेसकडे सादर झाले आहेत . 

दरम्यान, अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे काहींनी अर्ज नेऊन ते सादर केले नसल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसने मतदारसंघनिहाय इच्छुकांचे अर्ज मागवले होते. हे अर्ज काँग्रेस कमिटीतून वितरित केले.  जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतून ४८ इच्छुकांनी अर्ज नेले होते. त्यात सर्वाधिक इच्छुक राधानगरी विधानसभा मतदारसंघातील होते. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राधानगरीतून सात, चंदगड, शिरोळ व कागलमधून प्रत्येकी दोन, तर इचलकरंजीतून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा एकमेव अर्ज सादर झाला आहे.

अर्ज सादर केलेल्या प्रमुखांत माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजू आवळे, राज्य बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले, दत्ताजी घाटगे, माजी महापौर सागर चव्हाण, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील आदींचा समावेश आहे. 

इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज नेलेले आमदार सतेज पाटील, माजी मंत्री भरमू पाटील आदींचे अर्ज दाखल झाले नसल्याचे काँग्रेस कमिटीतून सांगण्यात आले. 

मतदारसंघनिहाय आलेले अर्ज

  •   करवीर - पी. एन. पाटील
  •   इचलकरंजी - प्रकाश आवाडे 
  •   राधानगरी - अरुण डोंगळे, विजयसिंह मोरे, उदयसिंह पाटील-कौलवकर, हिंदूराव चौगले, सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, 
  • शामराव देसाई
  •   चंदगड - पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, विष्णुपंत केसरकर
  •   कागल - दत्ताजी घाटगे, शिवाजी कांबळे
  •   उत्तर - सागर चव्हाण, बाजीराव खाडे, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी
  •   शाहूवाडी - बाळासाहेब सरनाईक, ओंकार सुतार
  •   हातकणंगले - राजू आवळे, प्रशांत कांबळे, 
  • माजी सभापती किरण कांबळे
  •   शिरोळ - दिलीपराव माने-पाटील, रणजितसिंह दिलीपराव माने-पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com