कऱ्हाड उत्तरमध्ये विधानसभेत परिवर्तन निश्‍चित - शेखर चरेगावकर

कऱ्हाड उत्तरमध्ये विधानसभेत परिवर्तन निश्‍चित - शेखर चरेगावकर

सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना कोट्यवधी रुपयांचा निधी अनेक योजनांसाठी दिला. यामुळेच आज कऱ्हाड उत्तरमध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी परिवर्तन होणार हे निश्‍चित आहे,’’ असे सहकार परिषदेचे अध्यक्ष  शेखर चरेगावकर यांनी प्रतिपादन केले.

जिल्हा परिषद सदस्य, कऱ्हाड उत्तर भाजपचे युवा नेते मनोज घोरपडे यांच्या वाढदिवस कऱ्हाड उत्तरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. यात उंब्रज, नागठाणे, कोपर्डे, देशमुखनगर, रहिमतपूर विभागात मोफत नेत्रचिकित्सा व मोफत चष्मे वाटप केले, तसेच वळसे येथील एहसास मतिमंद मुलांच्या वसतिगृहाला आर्थिक मदतीबरोबर मिष्टान्नाचे देण्यात आले. प्रथमतः घोरपडे यांनी मत्यापूर गावचे कुलदैवत हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबांतील महिलांनी त्यांचे औक्षण केले.

देशमुखनगर येथे रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन करून देशमुखनगर व्यापारी मित्रमंडळातर्फे केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा झाला. सायंकाळी मत्यापूर येथे अभीष्टचिंतन व संवाद मेळाव्यास शेखर चरेगावकर, महेश शिंदे, दिगंबर आगवणे, जितेंद्र पवार, सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

मनोज घोरपडे म्हणाले, ‘‘मागील विधानसभेत पराभव झाला असतानाही मी दुसऱ्या दिवसापासून लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत देशात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजप सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवल्या. कऱ्हाड उत्तरमध्ये फक्त उद्‌घाटन होऊन गेल्या २० वर्षांपासून रखडलेली हणबरवाडी- धनगरवाडी पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकर परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या सहकार्याने आज ती यशस्वीरीत्या मार्गी लावली.

मनोज घोरपडे यांना चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, विजय शिवतारे, नितीन बानुगडे- पाटील, अतुल भोसले, नरेंद्र पाटील, रावसाहेब दानवे, रणजितसिंह नाईक -निंबाळकर, योगेश सागर, शिवाजीराव नाईक यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

या वेळी भाग्यश्री मोहिते, विजयाताई गुरव, संजय घोरपडे, अण्णासाहेब निकम, राजेंद्र घोरपडे, ॲड. धनाजी जाधव, युवराज साळुंखे, इंद्रजित ताटे, नीलेश जाधव, बाळासाहेब खबाले- पाटील, रमेश कदम, शरद साळुंखे, सलिमभाई, दादासाहेब यादव, प्रशांत कदम, अनिल माने, विशाल शेजवळ, योगिराज सरकाळे, प्रशांत देशमुख, महेश जाधव, सुहास खांबे, जयवंत जाधव, शशिकांत मोहिते, सागर शिवदास, अशोक जाधव, जयवंत जगदाळे, संतोष पाटील, अमोल पवार, महेश चव्हाण, संभाजी पिसाळ, सचिन माने, धनाजी पाटील, राजू घाडगे, विकासअण्णा गायकवाड, रुक्‍मिणी जाधव, शेखर माने, रणजित माने, उत्कर्ष माने, यांच्यासह कऱ्हाड उत्तरमधील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य शिबिरास प्रतिसाद 
उंब्रज येथे १६३६ लोकांची मोफत तपासणी, २३१ लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन, ९३६ लोकांना चष्मे वाटप, रहिमतपूर येथे ९८१ लोकांची मोफत तपासणी, १२१ लोकांचे मोतिबिंदू ऑपरेशन, ६०३ लोकांना चष्मे वाटप, नागठाणे येथे लोकांची मोफत तपासणी १११३, १८७ लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन, ७२६ लोकांना चष्मे वाटप केले. कोपर्डे हवेली येथे १६३१ लोकांची मोफत तपासणी, २२६ लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन, १०१३ लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. आर्वी येथे रक्तदान शिबिरात ३१, मसूर येथे ६०, देशमुखनगर येथील ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com