विशेष पोलिस महानिरीक्षकपदी विद्या कुलकर्णी यांना पदोन्नती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

सोलापूर - चेन्नई (तामिळनाडू) मुख्यालयाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर विद्या कुलकर्णी यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या मूळच्या सोलापूरच्या आहेत. 1998 बॅचच्या आयपीएस विद्या कुलकर्णी यांची तमिळनाडू केडरसाठी निवड झाली. सहायक अधीक्षक म्हणून त्यांनी कुंभकोणम, पुदूकोटाई, दिंडीगल, पोलिस अधीक्षकपदावर नमक्कल, उटी, कोईमतूर या जिल्ह्यात काम केले. त्यानंतर पुणे (महाराष्ट्र) येथे त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागात (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पाच वर्षे काम केले. तमिळनाडूतील सेलम विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदावर त्यांना पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेत (सीआयडी) काम केले. नुकतीच त्यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. तमिळनाडूच्या मुख्यालयाचा पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Web Title: vidya kulkarni promotion to special ig