...तर राजकीय पक्षांना गाव बंदी करू - रघुनाथ पाटील

शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी उठली पाहिजे. दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे.
Raghunathdada Patil
Raghunathdada PatilSakal
Summary

शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी उठली पाहिजे. दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे.

इस्लामपूर - शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी (Export Ban) उठली पाहिजे. दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे. या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला (Political Party) गावात फिरकू दिले जाणार नाही, असा निर्धार शेतकरी नेते रघुनाथ पाटील (Raghunathdada Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपुरात केला.

येथील निर्मला सांस्कृतिक भवनमध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपटे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष वर्षा काळे उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले.

रघुनाथ पाटील म्हणाले,"केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांची शेतकरी हिताच्या विरोधी भूमिका आहे. ऊस उत्पादकांसाठी असणारा एसएमपीचा कायदा शरद पवार आणि त्यांच्या पाळीव शेतकरी संघटनांनी एकत्रित येते २००९ ला रद्द केला. आता पुन्हा एफआरपीच्या कायद्यातील शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेतले आहेत." धनंजय काकडे म्हणाले, "राजकारणी दलाल झाले आहेत. त्यांनी शेती व्यवस्था मोडीत काढली आहे."

माणिक शिंदे, वर्षा काळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. धनपाल माळी यांनी आभार मानले.शेतकरी संघटनेचे लक्ष्मण पाटील, केतन जाधव, प्रणव पाटील, माणिक पाटील, रवींद्र पिसाळ, माणिक व परशुराम माळी, नंदू पाटील, शंकरराव मोहिते, प्रदीप पवार यांनी संयोजन केले.

शेतकरी निर्धार -

लोकसभा, विधानसभेसह कोणतेही राजकीय व्यासपीठावरून साखर कारखानदार निवडणूक लढवीत असेल तर त्याला पराभूत करा. महामंडळाच्या नावाखाली टनाला दहा रुपये कपात करण्याच्या आदेशाची होळी करा. वीज बिल भरताना आपल्या शेतात असणाऱ्या वीज वितरण कंपन्यांच्या तारा, खांब, डीपी असल्याची जाणीव करून द्या. स्वातंत्र्यपूर्व काळात याबाबत कायदा असल्याची माहिती देत दबावतंत्र वापरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com