नागठाणेच्या तरूणाकडून गावठी कट्टा जप्त... स्थानिक गुन्हे अन्वेषणची मिरजवाडीत कारवाई

gavathi katta.jpg
gavathi katta.jpg

सांगली-  स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरजवाडी (ता. वाळवा) येथे गावठी कट्टा व काडतूस घेऊन थांबलेल्या फारूख आप्पालाल संदे (वय 20, रा. गणेशनगर, नागठाणे, ता. पलूस) याला अटक केली. त्याकडून गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस असा 20 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. संदे याच्याविरूद्ध आष्टा पोलिस ठाण्यात आर्म ऍक्‍टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी खास पथक नियुक्त केले आहे. पथकातील सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस व कर्मचारी इस्लामपूर विभागात माहिती काढत असताना हवालदार राजू मुळे यांना मिरजवाडी गावच्या चौकात एकजण कमरेला गावठी कट्टा लावून थांबल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे पथकाने मिरजवाडी-आष्टा रस्त्यावरील चौकात सापळा रचून संदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर गावठी कट्टा व काडतूस मिळाले. पंचनामा करून त्याला आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संदे याने गावठी कट्टा कोठून आणला? याचा तपास आष्टा पोलिस करत आहेत. गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक फडणीस, कर्मचारी राजू मुळे, जितेंद्र जाधव, आमसिद्ध खोत, संदीप नलवडे, संजय कांबळे, मीना माळी, सुरेखा कुंभार, विमल नंदगावे यांच्या पथकाने कारवाई केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com