वन्य प्राण्यांच्या प्रवेशामुळे नेर्ले परिसरातील ग्रामस्थांत दहशत 

विजय लोहार
Friday, 11 September 2020

नेर्ले (सांगली)-  येथील पुणे-बंगळूर महामार्गावरील सदा पाटील मळा व आत्मा विठुचा मळ्यात बिबट्या व तरस सदृश्‍य हिंस्त्र प्राण्यांनी लोकवस्तीत प्रवेश केल्याने माळ्यातील लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. परिसरात बिबट्या असून बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सदा पाटील मळ्यामध्ये अशोक पाटील यांच्या घराच्या अंगणात बिबट्याने प्रवेश केला. बाहेर भांडी घासत बसलेल्या महिलांना बिबटया दिसताच आरडाओरड केली. यावेळी बिबट्याने उसाच्या शेतात पळ काढला. 

नेर्ले येथील महामार्गाच्या पश्‍चिमेला सदा पाटील मळा आहे या मळ्यात रात्री येथील ऊस शेतातून डांबरी रस्त्यावरून येथील लोकवस्तीत प्रवेश केला. येथील युवक रोहित पाटील यांनी याबाबत वनविभागास कळवले. याच दरम्यान दक्षिणेला असणाऱ्या आत्मा विठुच्या मळ्यात तरसाचे ठसे आढळले आहेत. रानातून जाताना त्याचे नांगरलेल्या शेतात व राहत्या घरा समोर तरसाचे ठसे आढळून आले.

वनरक्षक दीपाली सागावकर म्हणाल्या,""शेतकऱ्यांनी त्यांची दुभती जनावरे बंदिस्त करावीत. लोकवस्तीत दक्षता घ्या. तरस हे घाण, जनावरे कुजलेले मरून पडलेलं खातात, तांबूस पिवळसर रंग असतो. कोणीही या प्राण्यास इजा अथवा मारपीट करू नये. बिबट्या व तरस यात फरक आहे.'' 
यावेळी 'आधार' ऍनिमल रिस्पेक्‍ट टीम नेर्ले, विजय मोरे, रोहित पाटील, प्रकाश पाटील, अंकुश खोत, बाजीराव पाटील, प्रतीक पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील, आनंदराव पाटील आदींनी शोध घेतला. दरम्यान, रात्री 11 वाजता झोपण्यापूर्वी सदा पाटील मळ्यात बिबट्या आल्याचे कळताच सगळ्यांची झोप उडाली. महिलांची भंबेरी उडाली. लोकांनी आरडाओरड करून त्यास हुसकावून लावले.बिबट्या मानव वस्तीत आल्याने भीतीचे वातावरण आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers in the Nerle area panicked over the entry of wild animals