विस्कळीत वीजपुरवठयाला कंटाऴून ग्रामस्थांनी वीजच नाकारली

किरण चव्हाण 
रविवार, 3 जून 2018

माढा ( जिल्हा - सोलापूर )  वीज वितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही वाकाव (ता. माढा) येथे सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने वाकाव ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीला लाईटचे पोल, विदयुत तारा, विदयुत जनित्र काढून नेण्याचे निवेदन दिेले असून विस्कळीत वीजपुरवठयाला कंटाऴून ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीची व्यवस्था व वीजच नाकरण्याचे महाराष्ट्रातील बहुदा पहिले अनोखे आंदोलन करणार असल्याचे निवेदन उर्जामंत्र्यांना दिले आहे. 

याबाबत ग्रामस्थांच्यावतीने आमदार तानाजीराव सावंत यांनी हे निवेदन उर्जामंत्र्यासह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिेले आहे. निवेदनात वाकाव गावाला मागील दहा बारा वर्षापासून विस्कळीत वीज पुरवठयाला सामोरे जावे लागत आहे. वाकावला मानेगाव येथून सिंगल व थ्री फेज वीजपुरवठा होतो. मानेगाव ते वाकाव दरम्यान सत्तर पोलची विदयुत वाहिनी असून ती बदलण्याची गरज अधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केली. मात्र वरिष्ठांनी आदेश देऊनही ही वीज वाहिनी बदललेली नाही. थोडा वारा, पाऊस आल्यास वीजप्रवाह खंडीत होतो. चोवीस तासातून सुमारे आठरा तास वीजप्रवाह बंदच असतो. थ्री फेज वीजप्रवाह आठ तास अपेक्षित असताना केवळ दोन अडीच तासच मिळतो अन त्यातही दर दहा - बारा मिनिटाला वीज ट्रीप होते. यामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठीही हाल होत आहेत.

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार पाठपुरावा करूनही यात काहीच फरक पडला ऩसल्याने ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीची वीज व्यवस्थाच नाकरण्याचा इशारा दिला आहे. तीस जूनपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील वीजेचे खांब, तारा, विदयुत जनित्रे काढून न्हावी तसेच वीजबिलापोटी शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसेही सव्याज शेतकऱ्यांना परत करावेत अशी मागणी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या व वीजेच्या लहरीपणाला कंटाळून ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीची व्यवस्था व वीज नाकारण्याचा महाराष्ट्रातील हा बहुधा पहिला प्रकार असावा. वीज सुरळीत न झाल्यास कंपनीच्या सोलापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयसमोर तीस जूनला उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: the villagers rejected electricity due to disrupted electricity