कंत्राटी कार्यकर्ते बनवणाऱ्यांची संस्कृती मोडीत काढा - विनय कोरे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मलकापूर - कंत्राटदारीतून कार्यकर्ते तयार करण्याची विरोधकांची संस्कृती मोडीत काढा आणि भागाच्या विकासासाठी स्थानिक प्रश्‍नांची जाण असणाऱ्या हक्काच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री विनय कोरे यांनी केले. जनसुराज्य-भाजप, कर्णसिंह गायकवाड व दलित महासंघ आघाडीच्या करंजफेण जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या करंजफेण व पणुंद्रे पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ पांढरेपाणी (ता. शाहूवाडी) येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. 

ते महणाले, ""गटातटाचं राजकारण करून माणसा-माणसात वैर वाढवण्याचे काम विरोधक करत आहेत, पण आम्हाला पार्टीचे राजकारण नको विकासाचे राजकारण हवंच. आमदारकीला आपणाला अतिआत्मविश्‍वास नडला आहे. या वेळी सर्वांनी स्वतःचं काम म्हणून वेळ देऊन काम करा.'' 

कर्णसिंह गायकवाड म्हणाले, ""कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्‍वास ठेऊ नका. आपल्या आघाडीवर विश्‍वास ठेवून मतदान करा. चांगल्या कामासाठीच आपली आघाडी आहे.'' 

जिल्हा बॅंकेचे संचालक व आघाडीचे शित्तूर वारुण मतदारसंघाचे उमेदवार सर्जेराव पाटील म्हणाले, ""ज्यांनी बोगस काम करून पैसे मिळविले त्या आता तुमच्या मतदारसंघात विरोधी आघाडीतून उभा आहेत. त्या बोलण्यात पटाईत आहेत. त्यांना भुलू नका. गावचा कारभार पाहणाऱ्या तुमच्या भागातील उमेदवारांनाच मतदान करा.'' 

या वेळी दीपक कांबळे (मांजरे), नारायण पाटील (माळापुडे), शिवाजी पाटील (उचत), सूर्यकांत पाटील (आंबर्डे) व उमेदवार संगीता सोरटे, युवराज पाटील, कमल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सत्यावन खेतल, ज्ञानदेव वरेकर, आनंदा वारे, लक्ष्मण पाणकर, चंद्रकांत पाटील, दीपक जाधव, सुरेश पवार, प्रदीप पाटील, सिराज महात, कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinay kore malkapur