"जन आक्रोश'साठी विनायक देशमुख राज्याचे समन्वयक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नगर : कॉंग्रेस पक्षातर्फे दिल्लीत 29 एप्रिल रोजी जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष राहुल गांधी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. त्यात महाराष्ट्र राज्यातून सहभागी होणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समन्वयाची जबाबदारी पक्षाचे राज्याचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे पक्षाचे राज्याचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी सांगितले. 

पाटील यांनी त्या संदर्भात राज्यातील जिल्हानिहाय शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांना पत्र पाठविले आहेत. जिल्हानिहाय किमान 300 पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या मोर्चात सहभाग असेल. त्याचे नियोजन तसेच सहभागी होणाऱ्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी त्यांची नावनोंदणी देशमुख यांच्याकडे करावी, अशा सूचना पाटील यांनी दिल्या आहेत. रामलिला मैदानावर महासभा होईल. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तेथे सकाळी दहा वाजता पोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

"जन आक्रोश'चे नियोजनासंदर्भात पक्षाच्या उच्चस्तरीय समितीची नवी दिल्ली येथे अलिकडेच बैठक झाली. राज्यातर्फे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण मुख्य नियोजक असतील. त्यांच्यातर्फे दिल्लीतील बैठकीत विनायक देशमुख यांनी राज्याचे प्रतिनिधी म्हणून सहभागाच्या नियोजनाची माहिती दिली. पक्षाचे महासचिव तथा राज्यस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, कमलनाथ, दिग्वीजयसिंह, शीला दीक्षित, मोहन प्रकाश, सी. पी. जोशी, मुकुल वासनिक आदींसह देशातील राज्यनिहाय प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. 

Web Title: vinayak deshmukh is co-coordinator for jan akrosh