सांगली महापालिकेच्या गटनेता व सभागृह नेतेपदी विनायक सिंहासने 

vinayak sinhasane.jpg
vinayak sinhasane.jpg

सांगली-  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या गटनेता व सभागृह नेतेपदी विश्रामबागमधील प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक विनायक सिंहासने यांची निवड झाली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपच्या बैठकीत निवड करण्यात आली. 

सत्ताधारी भाजपचा गटनेता आणि सभागृह नेता निवडीसाठी आज आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, कोअर कमिटीचे पदाधिकारी, महापौरांसह नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक झाली. शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे अध्यक्षस्थानी होते. भाजपचे माजी गटनेते युवराज बावडेकर यांचा राजीमाना दोन दिवसांपूर्वी पक्षाने घेतला. नवीन गटनेता निवडीसाठी आज आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयात बैठक झाली.

महापौर निवड पुढील महिन्यात होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गटनेतेपदाची संधी कुणाला मिळणार याकडे लक्ष होते. सिंहासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 
आमदार गाडगीळ, सुरेश खाडे, महापौर गीता सुतार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. 
राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश बिरजे, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, लक्ष्मीताई सरगर, धीरज सूर्यवंशी, गजानन मगदूम, अजिंक्‍य पाटील, राजेंद्र कुंभार, इम्रान शेख उपस्थित होते. 
संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी स्वागत केले. जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघमोडे यांनी आभार मानले. 

बंद पाकिटातून नाव.. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभागृह नेतेपदी विनायक सिंहासने यांचे नाव निश्‍चित केले. बंद पाकिटातून प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या पत्रातून सिंहासनेंचे नाव बैठकीत पाठवण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी पाकिट उघडून सिंहासने यांचे नाव सभागृह नेता आणि गटनेता म्हणून जाहीर केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com