६० वेळा रक्तदान करणारा अवलिया...

राजकुमार थोरात
बुधवार, 25 जुलै 2018

वालचंदनगर - कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर माणिक विठ्ठल ननवरे यांनी ६० वेळा रक्तदान करण्याचा बहुमान मिळवला.

येथील  महाविद्यालयाचे संस्थापक कै. विश्‍वासराव रणसिंग यांच्या जन्मदिवसाचे औच्युत साधुन आज बुधवार(ता.२५) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गेल्या ३४ वर्षापासुन रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज या शिबिरामध्ये माणिक ननवरे यांनी ६० वेळा रक्तदान करण्याचा बहुमान मिळवला. 

ननवरे हे १९८८ पासुन महाविद्यालयामध्ये कार्यरत असून, त्यांनी १९८९ पासुन रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत आहेत. ६० वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस वीरसिंह रणसिंग यांनी सांगितले की, रक्ताची निर्मिती कोणत्याही कारखान्यात तसेच कृत्रिमरित्या प्रयोगशाळेमध्ये करता येत नाही. रक्तदान म्हणजे जीवदान असून जास्तीजास्त युवकांनी रक्तदान करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे विश्‍वस्त हनुमंतराव रणसिंग, प्रकाश कदम, प्राचार्य अंकुश आहेर, शिवाजी कदम उपस्थित होते.  शिबिरामध्ये ५५ नागरिकांनी रक्तदान केले. बारामतीमधील माणिकबाई चंदुलाल श्राफ रक्तपेढीने रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले.

Web Title: vishvasrao ransing did 60 times blood donation