
Vishwajit Kadam Sangli Politics : भिलवडी जिल्हा परिषद गटात पारंपरिक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित असली, तरी ‘राष्ट्रवादी’च्या दोन्ही गटांतील हालचाली दिशा देणाऱ्या ठरतील. अद्याप येथे राजकीय स्तब्धता आहे. आरक्षणानंतर पत्ते उघडतील, मात्र काट्याच्या लढतीचे संकेत आहेत. गेल्या निवडणुकीत त्याची प्रचिती दिसून आली. येथील लढत माजी मंत्री व विद्यमान आमदार विश्वजित कदम यांचे राजकीय बळ आजमावणारी असेल.