
Sangli Zp Election : कडेपूर जिल्हा परिषद गट हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे आतापर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस अशा झालेल्या सामन्यात येथे सातत्याने भाजपने गड अबाधित ठेवला आहे. गतवेळच्या निवडणुकीत येथे भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख विरुद्ध तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सत्यजित यादव अशी चुलत बंधू मध्येच सामना झाला होता. त्यामध्ये भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली होती, तर आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत येथे काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना पाहावयास मिळणार आहे, असे असले तरी येथे आता नेमके काय आरक्षण पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर भाजप व काँग्रेसकडील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.