esakal | Don't Worry! घाबरण्याचे काहीच कारण नाही, 'विश्वास' आहे तुमच्यासोबत

बोलून बातमी शोधा

Don't Worry! घाबरण्याचे काहीच कारण नाही, 'विश्वास' आहे  तुमच्यासोबत
Don't Worry! घाबरण्याचे काहीच कारण नाही, 'विश्वास' आहे तुमच्यासोबत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: राज्यासह सांगली जिल्ह्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना आपत्तीमुळे भयग्रस्त होऊ नये. लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, भविष्याविषयी काळजी, आजाराविषयीची वाढती भीती, समज-गैरसमज यामुळे लोकामध्ये मानसीक आजारपण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्यावतीने "विश्वास.. कोरोना,' सोबत जगण्याचा..! हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधकारी डॉ. चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या "विश्वास कोरोना सोबत जगण्याचा' हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था कार्य करणार आहे.

हेही वाचा -बेडगात कोरोनाचा विस्फोट: एकाच दिवसात 43 नवे बाधित

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोव्हीड आपत्तीचा दुष्परिणाम शरीरा इतकाच माणसांच्या मनावरही होत आहे. यामुळे अनेकदा व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद-विवाद याबरोबरच कोव्हिडपश्‍चात रुग्णामध्ये आत्महत्येचे विचार येऊ नयेत व सामान्य नागरिकांच्या मनातील कोव्हीडविषयी अकारण भीती कमी व्हावी, या हेतूने जिल्हा प्रशासनाच्यावतीने ' हा अभिनव उपक्रम हाती घेवून मानसशास्त्रीय हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचा फायदा प्रत्येक कोव्हिड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होईल.

शुश्रुषा संस्थेचे अध्यक्ष व मानस तज्ञ कालिदास पाटील म्हणाले, सध्याच्या वास्तव परिस्थितीला सामोरे जाता न येणाऱ्या अनेक व्यक्तींना आत्महत्येपासून वाचविण्यासाठी व कोरोना सोबत भीतीमुक्त जगण्यासाठी शुश्रुषाच्या मानसतज्ञांची टीम कार्यरत राहणार आहे. 9422627571 हा योजनेचा मनोमित्र हेल्पलाईन नंबर असून या योजनेअंतर्गत रुग्णांचे चिंता, उदासीनता, ताण तणाव अशा विविध मानसीक त्रासांचे निदान करून तज्ञांकरवी मोफत समुपदेशन सेवा देण्यात येणार आहे, सोशल मीडिया द्वारे प्रबोधन, तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Edited By- Archana Banage