Sangli News : विटा नगरपरिषदेवर भगवा फडकेल! सुहास बाबरांचा आत्मविश्वास शिवसेनेच्या पॅनेल घोषणेनं निवडणुकीत नवा रंग
Shiv Sena Reveals Candidate : उमेदवारी अर्ज माघारीनंतर शिवसेना पॅनेलची घोषणा त्यांनी केली, त्या वेळी ते बोलत होते.विटा शहर घडविण्यात ज्या कुटुंबाचा वाटा होता, त्या कुटुंबातील उमेदवार आपण नगरपालिका निवडणुकीसाठी उभा केले आहेत.
विटा: ‘‘शहराला रूचेल असे उमेदवार शिवसेनेने दिले आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या पाठीशी उभा राहतील आणि विटा नगरपरिषदेवर भगवा फडकेल,’’ असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.